हौशी मराठी राज्य नाट्यस्पर्धेला १ डिसेंबरपासून सुरुवात
वेंगुर्ल्याला शुभारंभाचा प्रयोग ; सिंधुदुर्गसाठी स्वतंत्र केंद्र मंजूर
वेंगुर्ला
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने घेतली जाणारी ६३ वी हौशी मराठी राज्य नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी १ ते ८ डिसेंबर या कालावधीत वेंगुर्ले येथील नाटककार मधुसुदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात होणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा होणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालक दिभिषण चवरे यांच्यावतीने समन्वयक प्रशांत आपटे यांनी दिली.
वेंगुर्ले पत्रकार संघाच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत या स्पर्धेची समन्वयक संस्था म्हणून काम पाहणाऱ्या माझा वेंगुर्ला संस्थेच्या पदाधिका-यांनी स्पर्धेची अधिक माहिती दिली. माझा वेंगुर्ला संस्थेचे कार्याध्यक्ष संजय पुनाळेकर, सचिव राजन गावडे, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, संस्थेचे पदाधिकारी नीलेश चंदवणकर, कपिल पोकळे, सीमा बराते, नासिर मकानदार, जयप्रकाश चमणकर आदी यावेळी उपस्थित होते. यावर्षी वेंगुर्ला केंद्रावर आठ नाटकांचे सादरीकरण होणार आहे. राज्य नाट्य स्पर्धेतील सर्व नाटकांना जास्तीतजास्त प्रेक्षकांनी उपस्थित रहावे आणि हौशी रंगकर्मीचा उत्साह वाढवावा जसे, आवाहन संचालक चवरे यांनी केले आहे.
यावर्षीपासून हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी सिंधुदुर्ग हे स्वतंत्र केंद्र म्हणून मान्यता मिळाली आहे. हे वर्ष वेंगुर्ल्याचे सुपुत्र तथा थोर नाटककार जयवंत दळवी यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे या बोर नाटककाराच्या जन्मगावी म्हणजेच वेंगुर्ले येथे राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या सिंधुदुर्ग केंद्राला शुभारंभाचा मान मिळत आहे. ही एक प्रकारची जयवंत दळवी यांना आदरांजलीच ठरेल. वेंगुर्ले येथील नाट्यप्रेमींना तब्बल आठ नाटकांची मेजवानी मिळणार आहे. रोज सायंकाळी सात वाजता नाट्यप्रयोग सादर होणार आहे. गतवर्षी वेंगुर्ल्यात झालेल्या राज्य हौशी नाट्य स्पर्धेचे सर्वच्या सर्व प्रयोग हाऊसफुल्ल झाले होते. यावर्षीही वेंगुर्ले व लगतच्या परिसरातील नाट्यरसिकांनी या नाटकांना मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन माझा वेंगुर्ला संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
सहभागी नाटप्रयोग खालीलप्रमाणे :
१ डिसेंबर रोजी सायं. ७ वाजता विष्णू बाघ लिखित व मुहास खानोलकर दिग्दर्शित चार मुलांचा चाप’ हे नाटक वेंगुर्लातील कलावलय ही संस्था सादर करणार आहे. २ डिसेंबर रोजी सायं. ७ वाजता प्रकाश मावतकर लिखित प -वीण मांजरेकर दिग्दर्शित ‘मिशन ५९’ हे नाटक सावंतवाडी येयील मायभूमी प्रतिष्ठानतर्फे सादर करण्यात येणार आहे.
३ डिसेंबर रोजी सायं. ७ वाजता तुळस वेंगुर्ले येथील वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग वा संस्थेतर्फे प्रेमानंद गज्वी लिखित व राजेश गोवेकर दिग्दर्शित तन माजोरी है नाटक सादर केले जाणार आहे. ४ रोजी सायं. ७ वाजता कवठणी येथील साताई मध्यवर्ती संस्थेतर्फे विजय चव्हाण लिखित व रुपेश कर दिग्दर्शित “गावय”हे नाटक सादर केले जाणार आहे. ५ रोजी सायं. ७ वाजता पिंगुळी कुडाळ येथील सिद्धांत फाउंडेशन सिंधुदुर्ग या संस्थेतर्फ प्रसाद खानोलकर लिखित व दिग्दर्शित तुम्हाला काय वाटत?’ हे नाटक सादर केले जाणार आहे.
६ डिसेंबर रोजी सायं. ७ वाजता वसंत सबनीस लिखित व काशिनाथ मेस्वी दिग्दर्शित ‘सौजन्याची ऐसीतैसी हे नाटक सादर केले जाणार आहे. ७ डिसेबर रोजी वेगुर्ने उभादांडा येथील जीवनदायी विकास संस्थेतर्फे जयवंत दळवी लिखित व रमेश नार्वेकर दिग्दर्शित ‘सूर्यास्त हे नाटक सादर होणार आहे. ८ डिसेंबर रोजी इंद्रधनू कता मंच दामोती या संस्थेतर्फे स्वप्निल जाधव लिखित व सुहास मयेकर दिग्दर्शित श्याम तुझी आउस इली रे हे नाटक सादर होणार आहे.
या सर्वच्या सर्व नाटकांना नाट्यरसिकांची मोठी उपस्थिती लाभावी यासाठी माझा वेंगुर्ला संस्थेतर्फे प्रयत्न सुरु जाहेत शहर व ग्रामीण भागात यासाठी प्रचार प्रसाराचे काम हाती घेण्यात येणार आहेत. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही या नाट्यप्रयोगांना हाऊसफुल्ल चे बोर्ड झळकवता पावेत पासाठी माझा वेंगुर्ला तर्फे नियोजन करण्यात पेईल, वेगुर्लेवासीयांनी या नाट्यप्रयोगांना उपस्थिती दर्शवावी, असे यावेळी बोलताना संस्थेचे कार्याध्यक्ष संजय पुनाळेकर व माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप पांनी सांगितले.