शासकीय हमीभावाने भात खरेदी नोंद १५ डिसेंबरपर्यंत करण्याचे आवाहन
सावंतवाडी
सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात सावंतवाडी खरेदी-विक्री संघामार्फत ९ केंद्राच्या माध्यमातून आधारभूत किंमतीत भात खरेदी करीता शेतकरी नोंदणी सुरु करण्यात आली आहे.
आधारभूत किंमत भात खरेदी योजना २०२४-२५ करीता, सावंतवाडी खरेदी-विक्री संघाकडून शेतकरी नोंदणी सुरु करण्यात आली आहे. याकरीता शेतक-यांनी चालू पीक पेरा नोंदीचा भात शेतीचा ७/१२, आधारकार्ड झेरॉक्स,आधार लिंक माबाईल नंबर असणे आवश्यक आहे व पासबुकाची झेरॉक्स, वैयक्तिक घेवून भात खरेदी केंद्रावर स्वतः हजर राहून दि.१५ डिसेंबर २०२४ पर्यंत शेतकरी नोंदणी करुन घ्यावयाची आहे, असे आवाहन चेअरमन प्रमोद गावडे व व्हाईस चेअरमन रघुनाथ रेडकर यांनी केले आहे.
सावंतवाडी खरेदी-विक्री संघामार्फत सावंतवाडी, मळगांव, मळेवाड, तळवडे, डेगवे, कोलगांव, मडूरा, इन्सूली व भेडशी [दोडामार्ग] येथे भात खरेदी केंद्रे मंजूर करण्यात आली आहेत. तरी जास्तीत जास्त शेतक-यांनी नोंदणी करुन या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्री. प्रमोद गावडे व व्हा. चेअरमन श्री. रघुनाथ रेडकर तसेच संस्थेच्या सर्व संचालकांनी केले आहे.