सावंतवाडीत उद्या वाचक स्पर्धा, श्रीराम वाचन मंदिराचे आयोजन.
सावंतवाडी :
श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी या संस्थेच्या वतीने उद्या शुक्रवार दि. २२ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता तालुकास्तरीय वाचक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा विषय :- जयवंत दळवी यांच्या कोणत्याही प्रकारच्या साहित्य कृतीवर विवेचन करणे आवश्यक आहे.
स्पर्धेचे नियम व अटी :-
१. वय वर्षे १६ व त्यावरील कोणत्याही स्पर्धकाला स्पर्धेत भाग घेता येईल.
२. दिलेल्या विषयाचे रसग्रहण विवेच (वक्तृत्व) अपेक्षित आहे.
३. वेळ मर्यादा ७ मिनिटे.
४. प्रथम तीन क्रमांकाना रोख रकमेचे पारितोषिक प्रथम क्रमांक रु. ५००/-, द्वितीय क्रमांक रु. ३००/-, तृतीय क्रमांक रु. २००/- आणि प्रशस्ती पत्रक देण्यात येईल.
५. स्पर्धकांनी आपली नावे २१ नोव्हेंबर २०२४ पर्यंत ग्रंथालयाच्या कार्यालयीन वेळेत ग्रंथालयात द्यावीत.
६. अधिक माहितीसाठी ७३८५९७५२०९ या क्रमांकावर संपर्क साधावा.
७. परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक असेल.
स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाना जिल्हा ग्रंथालय, कुडाळ येथे रविवार दि. ०१ डिसेंबर २०२४ रोजी होणा-या जिल्हास्तरीय वाचक स्पर्धेत भाग मिळेल. तरी सावंतवाडी तालुक्यातील अधिकाधिक वाचकांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन संस्थेचे कार्यवाह श्री. रमेश बोंद्रे यांनी केले आहे.