*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखक कवी प्रा. डॉ.जी. आर. उर्फ प्रवीण जोशी लिखित अप्रतिम लेख*
*अक्षर*
विश्वातील अनादी काळापासून , अक्षरशः अक्षर निर्मिती ! न क्षरती इति
अक्षर ! ज्याचा नाश कधीच होत नाही असे अक्षर ! अक्षर कुठून तयार झाली ? भाषा व लिपी कोणती जरी असली तरी , अक्षर ही प्रथम नाद निर्माण करतात ! नाद हा परत दोन प्रकारचा आहत आणि अनाहत ! आहत नाद
मुखातून वा कोणत्याही आघातजन्य पदार्थापासून निर्मित असतो अनित्य असतो . अनाहत नाद हा स्वर्गीय नित्य असतो . मुखातील जिव्हा ,टाळू , दंत
ओष्ट , नासिक ह्यांच्या आघातामुळे नाद किंवा अक्षर तयार होत असते .
अ उ म – म्हणजेच ओम
हा आकार , उकार , मकार ह्या तीन धातूंपासून तयार झाला आहे .
अक्षर हे मानवाचे प्राण आहे ! बघा हं विचित्र वाटेल पण त्रिकालाबाधित सत्य आहे ! जन्मतः प्रसव झाल्यापासून को s हं ? किंवा को अहं ! ह्या अक्षरांना किती महत्व आहे हे तुम्ही जाणताच . बाळ रडले ह्याचा अर्थ त्याचा पहिला श्वास चालू झाला ! रडणे म्हणजेच श्वास घेणे आणि सोडणे , म्हणजेच त्याचा श्वासोच्छ्वास चालू झाला ! ह्यांचाच अर्थ त्याचे फुफ्फुसे व ह्रदय क्रिया चालू झाली !त्याला जीव प्राप्त झाला ! मंडळी हाच तो अनाहत नाद ! इथे कुठलाच आघात न होता अक्षर तयार झाले ! ईश्वर निर्मित नाद ! अक्षरे देऊन गेला ! प्राण व्यानं उदान ह्या वायूची गती इथे प्राप्त झाली . प्राण ह्रदयस्थित व्यानं फुफ्फुस स्थित , उदान कंठ स्थित !
आपण बोलताना वरील तिन्ही वायूंचे चलनवलन होत असतेच . अपान वायू मलमूत्र विसर्ग होत असताना कार्य करते . तर समान वायू
अग्निवर्धन करून अन्न पचन करते . आघात होण्यासाठी वायू व आकाश ह्याची गरज
आघात मुखात होतो व तोंडातील वा श्वास मार्गातील पोकळी किंवा अवकाश अक्षर , शब्द निर्मिती करत असते . माणूस सजीव असेपर्यंत अक्षर आवाज जन्मापासून मृत्यू पर्यंत अव्याहतपणे चालू असते ! आघात अक्षर शब्द हे जेव्हा थांबतील तेव्हा जीव नाहीसा होतो ! जीव जात असताना पण घश्यात घुरघुर लागते व श्वास थांबतो – त्यालाच मृत्यू
म्हणतात !
अनेक अक्षर मिळून शब्द तयार होतो , परा – पश्चन्ती मध्यमा – वैखरी ही त्याचे सूक्ष्म रूपे होत ! बेंबीच्या देठापासून ते कंठातून – मुखापासून बाहेर पडण्याच्या क्रियेला खरतर
फुफ्फुसे व कंठ श्वासपटल मुख ही सर्व कार्यरत असतात ! त्यासाठी वरील तिन्ही वायूचे साक्षात प्राणाचे कार्य अव्याहतपणे चालू असते . शरीरांतर्गत ह्या सूक्ष्म क्रिया असतात . तो सजीव बोलत असतो आहत नादामुळे , मुखातील आघातामुळे ! ह्याच आघातामुळे नादमय संगीत पण तयार होत असते .
अक्षर ही सरस्वती कृत निर्मित ! तर चौदा विद्या चौसस्ट कला ह्या श्री गणेशाधीन श्री गणपती ही त्याची देवता . मग सरस्वती पूजन का ? सरस्वती ही प्रत्येक्ष्यात प्रतिभा ! उत्स्फूर्तता ! सृजनशील ! वाक् – बोलणे , ईश्वरी – अनाहत नाद निर्माण करणारी बीज मंत्र !
अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ आं
यरळवष श स हं ळ क्ष ज्ञ
क ख ग ग इत्यादी मुळाक्षरे
काही भाषेत बाराखडी , तर काही भाषेत चौदाखडी !
उदा . कानडी भाषा चौदाखडी ( ह्रस्व आणि दीर्घ ए ) असो .
पाणिनीला मात्र वेगळीच बीजमंत्र मिळाले . शंकराच्या डमरूतुन त्याला चौदा शब्द समुच्चय मिळाला ! त्यावरच पाणिनीने लघुसिद्धांत कौमुदी हे व्याकरण शास्त्राचे नवीन प्रबंध निर्माण केला . जे आजही व्याकरण शास्त्राचे आधारभूत ग्रंथ म्हणून पाहिले जाते . चार चार अक्षरांचा चौदा समूह तयार करून त्यांनी , अक्षरपट मांडला . विस्तार भयास्तव येथे देत नाही ! तरीपण ह्या शास्त्राला नाद संरचना ( phoneticks ) म्हणून जगात मान्यता आहे !
कर्ण बधिर शास्त्रात उपयोग केला गेला ! महत्वाचे म्हणजे
मला अस प्रश्न पडतो की ?
सुदृढ माणूस ऐकू शकतो , बोलू शकतो . मूक बधिरांचं काय ? ? अक्षर समूह म्हणजे शब्द , शब्द समूह म्हणजे वाक्य . नाम क्रियापद कर्म , इत्यादी .
ही मुळाक्षरे, तसेच संगीत शास्त्रातील , “सा रे ग म प ध नी सा ” सप्तसूर कोमल स्वर
” मंद्र मध्य तार सप्तक” ह्यांचा
कंठातून होणारा आघात – नादमय ध्वनी इथे मुळाक्षरे
सप्तस्वरच राज्य करतात !
अस असलेतरी मुखातून आलेला ध्वनी कर्ण पटलावरच कार्य करतात , किंबहुना कर्ण अबाधित असेलतरच ह्याचे ज्ञान होणार .
मुळाक्षरे जशी आहेत तशीच बिजाक्षरे पण वेदानी प्रमाणभूत मानली आहेत . हीच बिजाक्षरे देवांच्या प्राण प्रतिष्ठासाठी ग्राह्य मानली जातात .
आपण वार्षिक गणपतीचा उत्सव दहा दिवस
आनंदाने साजरा करतो . दहा दिवस आपण मनोभावे पूजा करतोच बाजारातून आणलेला गणपती, घरी पूजेसाठी ज्यावेळी मांडतो त्यावेळी ,
बिजाक्षरानी त्यात प्राण व्यान उदान अक्षरांनी प्रतिष्ठा केली जाते . ती अक्षरे खालीलप्रमाणे .
ओं आं ह्रिम क्रोम् ।
अं यं रं लं वं शम वं सं हं लं
इत्यादी — सर्व अनुनासिक अक्षर
जन्मतः बाळ रडत ते पण अनुनासिक अक्षर !
को ss हं किंवा टँहै टँह्या
ही अशी अनादी अनंत प्रक्रिया सृष्टीत अव्याहत चालू आहेच . बऱ्याच वनस्पतीमध्ये पण ही क्रिया चालू असतेच उदा . केळीचा
कोका ज्यावेळी बाहेर पडतो त्यावेळी आवाज येतो . तो अक्षरशः अक्षरांनी . तस बरेच काही अक्षराबद्दल सांगता येईल . ह्या जगात तुम्ही आम्ही असू वा नसू पण अक्षरे ही अबाधित असतील एवढं मात्र खरे !
तेच प्रांजळ सत्य आहे .
प्रा डॉ जी आर जोशी
नसलापुर बेळगाव
कॉपी राईट