मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
मुंबईतील विद्यार्थी उत्कर्ष मंडळाची ‘विवेकानंद व्याख्यानमाला’ यंदा मंगळवारी, २६ नोव्हेंबर ते शनिवार, ३० नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. ही व्याख्यानमाला निसर्गावर आधारित असून ‘नाते जोडू निसर्गाशी’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित विविध विषयांवर तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत.
*व्याख्यानमालेचे वेळ आणि स्थळ*
– व्याख्यानमाला लालबागमधील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण (गरमखाडा) येथे आयोजित केली जाईल.
– व्याख्याने दररोज रात्री ८.३० वाजता होतील.
*व्याख्यानमालेतील व्याख्याने आणि व्याख्याते*
– २६ नोव्हेंबर: कीटक अभ्यासक नूतन कर्णिक – ‘जावे मुंग्यांच्या जगात’
– २७ नोव्हेंबर: वन्यजीव अभ्यासक अनुज खरे – ‘वाघोबाच्या जंगलात’
– २८ नोव्हेंबर: निसर्गप्रेमी कौस्तुभ ताम्हणकर – ‘शून्य कचरा व्यवस्थापन’
– २९ नोव्हेंबर: हत्ती अभ्यासक आनंद शिंदे – ‘एक संवाद हत्तीशी’
– ३० नोव्हेंबर: निसर्ग अभ्यासक किरण पुरंदरे – ‘जंगलातील ४०० दिवस’
व्याख्यानमाले संदर्भातील अधिक माहितीसाठी आणि प्रवेशिकेसाठी व्याख्यानमाला प्रमुख गणेश टापरे यांच्याशी ९९३०३३४२४३ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.