कोणतीही निवडणूक म्हटली की सर्वात जास्त ताण येतो तो शासकीय व निमशासकीय कार्यालयांवर व कर्मचाऱ्यांवर. निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी अनेक अधिकारी कर्मचारी यांना अहोरात्र काम करावे लागते. सुट्या रद्द झालेल्या असतात . मतदार संघात कुठे पण ड्युटी लागू शकते ? ती मग आदिवासी क्षेत्रात दुर्गम भागात पण असू शकते. या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी अमरावतीच्या विभागीय आयुक्तांनी सर्वांच्या सहकार्याने अमरावती महसूल विभागामध्ये पाच जिल्ह्यांमध्ये कर्तव्यनिष्ठ कर्मचारी अभियान राबविले आणि आता जेव्हा निवडणूक संपली तेव्हा ते सफल करूनही दाखवले. खरं म्हणजे या पाच जिल्ह्यांमध्ये विविधता आहे. त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा व धारणी हा भाग म्हणजे दुर्गम .पण या सर्वांचा समन्वय साधून आणि सर्वांना विश्वासात घेऊन कर्तव्यनिष्ठ कर्मचारी अभियान सफल करण्यामध्ये अमरावती विभाग यशस्वी झाला आहे. हे अभियान राबवताना भारताचे माननीय मुख्य निवडणूक आयुक्त यांच्या कार्यालयाने घालून दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात आले आहे. खरं म्हणजे ही निवडणूक प्रक्रिया फार मोठी असते .कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण तसेच निवडणूक यंत्र हाताळण्याचे प्रात्यक्षिक. त्यांना त्या त्या भागात उपलब्ध असलेल्या सुविधा सुरक्षितता मानधन प्रमाणपत्र या सर्वांचा समावेश असतो .सर्वात महत्त्वाचे म्हणजे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा नैतिक विश्वास वाढवणे त्यांचे आत्मबल वाढवणे हे गरजेचे असते .ही बाब लक्षात घेऊन अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त डॉ. निधि पांडे यांनी आपल्या पाचही जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन कर्तव्यनिष्ठ कर्मचारी अभियान अमरावती विभागात यशस्वी करून दाखवले आहे. सर्वात महत्त्वाचे आता निवडणूक संपून काहीच तास झालेले आहेत .या अल्पावधीमध्ये त्यांनी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना पण प्रमाणपत्र देखील बहाल केलेली आहे. यावरून या कर्तव्यनिष्ठ कर्मचारी अभियानामध्ये सर्वच कर्मचारी किती कर्तव्यदक्ष होते याची प्रचिती येते. हे सर्व अभियान राबवण्यासाठी पाचही जिल्ह्यामध्ये नोडल ऑफिसर यांना विश्वासात घेऊन त्यांना या अभियानाची कल्पना देऊन त्यांचे सहकार्य घेऊन हे राष्ट्रीय कर्तव्य व्यवस्थित पार पाडण्यात अमरावती महसूल विभाग यशस्वी झाला आहे. या कामासाठी विभागीय आयुक्तांबरोबरच त्या त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अधिकारी व कर्मचारी यांचे देखील भरीव शंभर टक्के योगदान लाभल्यामुळे हा उपक्रम यशस्वी ठरलेला आहे. याशिवाय हा उपक्रम राबवण्यासाठी निरीक्षक म्हणून आलेले दुसऱ्या राज्यातील सनदी अधिकारी यांच्या देखील मार्गदर्शन घेण्यात आले आहे. स्वतः विभागीय आयुक्त डॉ. निधि पांडेय यांनी पाचही जिल्ह्यात दौरा करून ठिकठिकाणी भेटी देऊन कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही निवडणूक आपणास पार पाडावयाची आहे आणि एका अर्थाने तुम्ही निवडणूक पार पाडणारे कर्मवीर आहात. अशाप्रकारे त्यांचे मनोबल आत्मविश्वास वृद्धिंगत करण्यात आला आहे. त्याचबरोबर मतदान करणाऱ्या मतदारांचा देखील जास्तीत जास्त प्रमाणात मतदान झाले पाहिजे त्यांच्या मनातील शंकाचे समाधान झाले पाहिजे यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले व ते यशस्वी ही झाले आहेत. विशेष म्हणजे आज जेव्हा निवडणूक संपली तेव्हा या निवडणुकीमध्ये सहभागी झाल्याने झालेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांचे मानधन व प्रमाणपत्र देखील तात्काळ अदा करण्यात आले आहे. त्याचबरोबर पाचही जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांनी वेगवेगळ्या मतदार क्षेत्रात दिलेल्या भेटीचा पाहणीचा कार्यवाहीचा अहवाल देखील लगेच सादर करण्यात आलेला आहे. हे इतके काम तत्परतेने संपन्न करण्यासाठी गेल्या काही महिन्यापासून माननीय विभागीय आयुक्त व त्यांचे अधिकारी राबत होते. हे अभियान यशस्वी व्हावे निवडणुकीला कुठलेही गाल बोट लागू नये मतदारांमध्ये जनजागृती असावी कर्मचारी व अधिकारी यांच्यामध्ये समन्वय आत्मबल मनोबल आणि आत्मविश्वास असावा यासाठी या सर्वांनी मनापासून प्रयत्न केले आणि म्हणूनच अमरावती महसूल विभागातील निवडणूक ही शांततेत व शिस्तीत पार पडली. कर्तव्यनिष्ठ कर्मचारी अभियान ही योजना राबवण्यासाठी ज्या ज्या मान्यवरांनी आपला सहभाग नोंदवला त्या सर्वांचे आभार मानावेसे वाटतात.
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक मिशन आय ए एस
अमरावती