विधानसभेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७१.११ टक्के
कणकवली ६९.५५,कुडाळ ७२.२९,सावंतवाडी ७१.५५ टक्के मतदान ; २०१९ विधानसभेपेक्षा ७.१९ टक्क्यांनी मतदानात वाढ
सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभेच्या तीन जागांसाठी एकूण ६ लाख ७८ हजार ९२८ मतदारांपैकी ४ लाख ८२ हजार ७५२ मतदारांनी मतदान न केले असून एकूण ७१.११ टक्के मतदान झाले आहे. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ६३.९२ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे यावेळी ७.१९ टक्के मतदानात वाढ झाली आहे. जिल्हा निवडणूक विभागाने मतदानाची अंतिम आकडेवारी रात्रौ उशिरा जाहीर केली आहे.
कणकवली विधानसभा मतदार संघात ६९.५५ टक्के, कुडाळ विधानसभा मतदार संघात ७२.२९ टक्के,सावंतवाडी मतदार संघात ७१.५५ टक्के मतदान झाले आहे. यंदा मतदानात वाढ झाल्याने मतदानाचा हा वाढीव टक्का कुणाच्या पथ्यावर पडणार याचे चित्र शनिवारी २३ नोव्हेंबरला जाहीर होणार आहे.