कणकवली :
कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांनी वरवडे फणसवाडी येथील आपल्या मूळ गावी मतदान केंद्रावर जाऊन सायंकाळी उशिरा मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मला समाधान वाटते की कानाकोपऱ्यातील आमचे कार्यकर्त्यांनी मतदारांना बाहेर काढण्याचे काम केले. गावागावात बैठका घेऊन मेहनत घेतली. लोकांचाही चांगला प्रतिसाद आहे. लोकांची दहा वर्ष मी प्रामाणिकपणे सेवा करत आलेलो आहे. याची जाणीव मतदारांना आहे. माझ्या मतदारसंघातील २६३ गावांचा विकास झाला पाहिजे या हेतूने काम करत आहे. मतदारांनी दाखवलेला विश्वास २३ तारखेला मतपेटीतून दिसेल. त्यामुळे मी पूर्णपणे समाधानी असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले. यावेळी त्यांच्या समवेत प्रकाश सावंत, सोनू सावंत, ॲड. अभिजीत सावंत, संतोष पुजारे, अशोक राणे, सादिक कुडाळकर तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.