*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कुसुमाग्रातुन….!!!*
शारदीय लेणे
पुनव चांदणे
मौक्तिक साज
स्वप्निल गाणे….!
भक्तीरसात बहरली
वेल फुलांची
साक्ष गंधली
वाट प्रीतीची…!
गाभा-यातून येई
पवित्र दरवळ
निरांजन आतुरलेली
भक्तीबीजाला भोवळ..!
भाव मुग्धशी
सुरम्य धरती
सुगंध गुंफित
अवधी तृप्ती..!
कुसुमाग्रातुन कदंब
मनाच्या सांदीपनीत
श्यामलसा उरात
चैत्रपालवी वेल्हाळात…!!
बाबा ठाकूर