You are currently viewing निवडणूक

निवडणूक

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*निवडणूक*

 

निवडणूक

जसजशी जवळ येते

तसतसे तिच्या चर्चेला उधान येते

ती येते मुळातच पाच वर्षातून एकदा

कधी कधी आणीबाणी नंतर

केव्हा केव्हा तर अविश्वासानंतर

मधेच तिची हजेरी लागते

 

तरीही ती नेहमीच चर्चेत असते

विषय असतो

मागच्या किंवा पुढच्या

निवडणुकीचा

 

सत्ता स्थापने हे तिचे आद्य कर्तव्य

त्यासाठी ती अहोरात्र कसरत करते

कष्ट मेहनत हे तिच्या

पाठीलाच पुजलेले असतात

 

तिचं अस्तित्व अबाधित जरी असलं

तरी ते संख्याबळावर टिकते

ती देशाच्या राज्याच्या पालिकेच्या

पंचायतीच्या राजकारणाचं

राजकारण्यांचं गणित ठरवते

कुणाला धोबीपछाड देते

तर कुणाची लॉटरी लावते

तिच्या प्रचाराचा पसारा खूप मोठा

तसा तिचा थाटच निराळा

 

वैचारिक पातळीवर ती

सत्याच्या बाजूने असली

तरी पैशापुढे तिला झुकाव लागतं

जनतेचा कौल जिकडे

शेवटी तिकडेच असावं लागतं

 

ती येते निर्विवादपणे पार

पडण्याचे स्वप्न घेऊन

मधेच विघ्नांचे गालबोट लागते

तरीही ती आपले कर्तव्य पार पाडते

 

निवडणुकीची स्वप्न असतात

देशाचा विकास सुशासन

प्रगती व गोरगरिबांसाठी न्याय

जनता ही तिच्या भरवशावरच

 

एकदा तरी

योग्य उमेदवारचं सरकार मिळो

तिच्या स्वप्नांचं सोनं होवो

आता झालं नाही तर

पुढच्या पंचवार्षिक ची वाट बघू

आताच्या निवडणुकीचं गाजर

कुठल्या पक्षांना पुढार्‍यांना पचतंय

हे तर बघू….

 

कवी:-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर, धुळे.*

*७५८८३१८५४३.*

प्रतिक्रिया व्यक्त करा