सावंतवाडी :
युवा नेते तथा अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी आज सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी चराठे येथील जिल्हा परिषद शाळेत त्यांनी सपत्नीक मतदान केले. गेले सहा महिने मी ही लढाई लढण्यासाठी उतरलो आहे. येथील जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे असा दावा विशाल परब यांनी केला. यावेळी पत्नी वेदीका परब, अमित परब, ओंकार पावसकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.