You are currently viewing काव्यगंध समूह आयोजित काव्यमैफिल तसेच सौ. गिरीजा मोहन भुमरे लिखित “हृदयातील पाझर” या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

काव्यगंध समूह आयोजित काव्यमैफिल तसेच सौ. गिरीजा मोहन भुमरे लिखित “हृदयातील पाझर” या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) – दिनांक 17 नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील सिद्धार्थ उद्यान येथे काव्यगंध समूहाने काव्य मैफिल आणि प्रकाशन सोहळा कार्यक्रम आयोजित केला होता.काव्यागंध समूहाचे अध्यक्ष कवी श्री. प्रशांत गोरे सर आणि कवयित्री ॲड अक्षशिला शिंदे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कवयित्री सौ. गिरीजा मोहन भुमरे लिखित “हृदयातील पाझर” या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. स्पंदन प्रकाशनची निर्मिती असलेला हा मराठी कवितासंग्रह आहे. निसर्गाच्या सानिध्यात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. काव्यमैफिलीमध्ये विविध आध्यात्मिक, सामाजिक, राजकीय, कौटुंबिक, विनोदी बहारदार भावस्पर्शी रचना सादर करत रसिकांची मने जिंकली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी अर्जुन गायकवाड यांनी केले.

या काव्यमैफिलीत उपस्थित असलेल्या सर्वच कविंच्या कविता अतिशय प्रभावी झाल्या. या काव्यमैफिलीत कवी श्री.विवेक जोशी, श्री.ज्ञानदेव डिघुळे, सौ. डिघुळे , श्री.नागेश बोंतेवाड , सौ. कविता गायकवाड, श्री.अर्जुन गायकवाड, श्री.मोहन भुमरे, डॉ. सुशिल सातपुते यांनी उत्स्फूर्तपणे कविता सादर केल्या. सर्व कवी कवयित्री यांना पुष्पगुछ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सर्व स्तरातून या प्रकाशन सोहळ्याचे तसेच काव्यमैफिलीचे कौतुक होताना दिसत आहे. या कार्यक्रमाचे आभार कवी श्री विवेक जोशी यांनी व्यक्त केले. सर्वांनी कवयित्री सौ. गिरीजा भुमरे यांना पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा