जिल्ह्यातील १७ उमेदवारांचे भवितव्य ६ लाख ७८ हजार ९२८ मतदार ठरविणार.
जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन सज्ज
सिंधुदुर्गनगरी
विधानसभेसाठी राज्यात उद्या बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. जिल्ह्यातील कणकवली कुडाळ व सावंतवाडी या तीन विधानसभा मतदार संघात १७ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण ९२१ मतदान केंद्रावर जिल्ह्यातील ६ लाख ७८ हजार ९२८ मतदार आहेत. भारतीय जनता पक्ष, शिंदे शिवसेना या सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उद्या मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक उपविभागीय कार्यालयाच्या ठिकाणी शनिवार दिनांक 23 रोजी होणार आहे.
सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होत आहे. कणकवली विधानसभेसाठी विद्यमान आमदार नितेश राणे भाजप पक्षाच्या कमळ निशाणीवर, कुडाळ मालवण मतदार संघातून शिंदे शिवसेना पक्षातर्फे धनुष्यबाण निशाणीवर निलेश राणे व सावंतवाडी मतदारसंघातून धनुष्यबाण निशाणीवर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे तिनही विधानसभा लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहेत. या जिल्ह्यात एकूण ९२१ मतदान केंद्रावर जिल्ह्यातील ६ लाख ७६ हजार ६५५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्तासह साडेपाच हजार निवडणूक कर्मचारी मतदान केंद्रावर रवांना होत मतदान केंद्राचा ताबा घेतला आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस अधिकारी व होमगार्ड सह तीन हजार पोलीस जिल्ह्यात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले असून निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम १५ ऑक्टोबरला जाहीर झाला त्यानंतर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणे व प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर आता मतदानाची वेळ आलेली आहे बुधवारी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात होऊन सायंकाळी ६ वाजता संपणार आहे मतदानासाठी जिल्ह्यात ९२१ मतदान केंद्रे असून त्यासाठी नेमलेले निवडणूक कर्मचारी आदल्या दिवशीच मंगळवारी मतदान केंद्रावर मतदान यंत्रासह रवांना झाले आहेत त्याच्यासाठी एसटी बसेसची सोय करण्यात आली होती प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्षासह चार निवडणूक कर्मचारी ,एक पोलीस व एक होमगार्ड राहणार आहे असे साडेपाच हजार कर्मचारी नियुक्त केले असून त्यांनी मतदान केंद्राचा ताबा घेतला आहे मतदान यंत्रात बिघाड झाल्यास तात्काळ दुसरे मतदान यंत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे त्यासाठी राखीव मतदान यंत्रे ठेवण्यात आली आहेत जिल्ह्यात ठिकठिकाणी व्हीडीओ चित्रीकरणही केले जाणार आहे
जिल्ह्यात ६ लाख ७८ हजार ९२८ मतदार आहेत त्यात ३,३६,९९१ पुरुष मतदार,३,४१,९३४ महिला मतदार आणि ३ तृतीय पंथी मतदारांचा समावेश आहे तसेच कणकवली मतदार संघात २,३१,७४० मतदार आहेत , कुडाळ मतदार संघात २,१७,१८६ मतदार आहेत, सावंतवाडी मतदार संघात २,३०,००२ मतदार आहेत दरम्यान एकूण मतदारांपैकी दिव्यांग व ८५ वर्षांवरील २,२७३ मतदारांनी मतदान केले आहे त्यामुळे उर्वरित ६ लाख ७६ हजार ६५५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत मतदान करताना निवडणूक ओळखपत्रासह १२ प्रकारची अन्य ओळखपत्रे दाखविल्यास मतदान करता येणार आहेत याची माहिती यापूर्वी जाहीर करण्यात आली आहे
मतदान प्रक्रिये मध्ये कुठेही बाधा येऊ नये किंवा अनुचित न घडता मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्ह्यात ७२ पोलीस अधिकारी,होमगार्ड , एसआरपीएफच्या पाच कंपन्या ,व जिल्ह्यातील पोलीस मिळून ३ हजार पोलीस बंदोबस्तासह तैनात करण्यात आले आहेत जिल्ह्याच्या सीमा भागातील चेक पोस्टवर ड्रोन कॅमेरा द्वारे लक्ष ठेवला जाणार आहे दरम्यान जिल्ह्यातील मतदारांनी निर्भय वातावरणात उस्फुर्तपणे मतदान करावे असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अनिल पाटील व पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी केले आहे
मागील २०१९ च्या निवडणुकीत जिल्ह्यात ६३.९२ टक्के मतदान झाले होते मात्र यावेळी ही टक्केवारी वाढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जनजागृती करण्यात आली असून मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी मतदरांच्या घरोघरी व्होटर स्लीप वाटप करण्यात आल्या आहेत त्यामुळे ७५ टक्के हून अधिक मतदान होईल अशी अपेक्षा धरण्यात आली असून त्यादृष्टीने जिल्हा प्रशासन आणि निवडणूक उमेदवारांकडून प्रयत्न केले जात आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 03 विधानसभा मतदार संघात एकूण 6 लाख 78 हजार 928 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरूष मतदार 3 लाख 36 हजार 991 , स्त्री मतदार 3 लाख 41 हजार 934 तर 3 तृतीयपंथीयांचा समावेश आहे. विधानसभा मतदार संघ निहाय संख्या पुढीलप्रमाणे. 268 कणकवली विधानसभा मतदार संघात एकूण 2 लाख 31 हजार 740 (पुरूष 1 लाख 14 हजार 379, स्त्री 1 लाख 17 हजार 359 तर 02 तृतीयपंथी एवढे मतदार आहेत. 269- कुडाळ विधानसभा मतदार संघात एकूण 2 लाख 17 हजार 186 (पुरूष 1 लाख 7 हजार 964, स्त्री 1 लाख 9 हजार 221 तर 01 तृतीयपंथी) मतदार आहेत. 270 सावंतवाडी विधानसभा मतदार संघात एकूण 2 लाख 30 हजार 02 (पुरूष 1 लाख 14 हजार 648 तर स्त्री 1 लाख 15 हजार 354)मतदारांचा समावेश आहे.
जिल्ह्यात दिव्यांग मतदारांची एकूण संख्या 8 हजार 82 एवढी आहे. यामध्ये पुरूष मतदार 4 हजार 473 तर 3 हजार 609 स्त्री मतदारांचा समावेश आहे. विधानसभा मतदार संघ निहाय संख्या पुढील प्रमाणे. 268- कणकवली एकूण दिव्यांग मतदार 6 हजार 321 (पुरूष 3 हजार 330, स्त्री 2 हजार 991), 269- कुडाळ विधानसभा मतदारसंघ एकूण दिव्यांग मतदार 837 (पुरूष 518, स्त्री 319) तर 270 सावंतवाडी विधानसभा मतदार संघात एकूण दिव्यांग मतदार 924 (पुरूष 625, स्त्री 299) एवढे आहेत.
85 वर्षांवरील मतदारांची एकूण संख्या 10 हजार 198 असून यामध्ये 3 हजार 853 पुरूष मतदार, 6 हजार 344 स्त्री मतदारांचा तर 1 तृतीय पंथीयाचा समावेश आहे. विधानसभा मतदार संघ निहाय संख्या पुढील प्रमाणे. 268- कणकवली मतदार संघांतील 85 वर्षांवरील मतदारांची एकूण संख्या 3 हजार 662 (पुरूष 1हजार 402, स्त्री 2 हजार 260), कुडाळ विधानसभा मतदार संघामध्ये एकूण मतदार 3 हजार 179 (पुरूष 1 हजार 205, स्त्री 1 हजार 973 तर 1 तृतीय पंथीय) सावंतवाडी विधानसभा मतदार संघामध्ये एकूण मतदार 3 हजार 357 (पुरुष 1 हजार 246, स्त्री 2 हजार 111) एवढे आहेत.
जिल्ह्यात 18 ते 19 वयोगटातील एकूण 12 हजार 316 मतदार आहेत. यामध्ये पुरूष 6 हजार 830, स्त्री 5 हजार 485 तर 01 तृतीयपंथी) मतदाराचा समावेश आहे. विधानसभा मतदार संघ निहाय संख्या पुढील प्रमाणे. 268- कणकवली विधानसभा मतदारसंघात एकूण 4 हजार 331 (पुरूष 2 हजार 427, स्त्री 1 हजार 903 तर 01 तृतीयपंथी) मतदाराचा समावेश आहे. 269 कुडाळ विधानसभा मतदार संघात एकूण 4 हजार 303 (पुरूष 2 हजार 411 तर स्त्री 1 हजार 892) मतदारांचा समावेश आहे. 270 सावंतवाडी विधानसभा मतदार संघात एकूण 3 हजार 682 (पुरूष 1 हजार 992, स्त्री 1 हजार 690) एवढे आहे.
निवडणूक रिंगणात असलेले हे आहेत १७ उमेदवार
जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघाच्या जागासाठी १७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत यामध्ये कणकवली मतदार संघात- सहा उमेदवार रिंगणात असून महायुतीचे भाजपाकडून आमदार नितेश राणे विरुद्ध महाविकास आघाडी कडून ठाकरे सेनेचे उमेदवार संदेश पारकर यांच्यात लढत होत आहे तसेच बहुजन समाज पक्षाचे चंद्रकांत जाधव , अपक्ष उमेदवार गणेश माने,बंदेनवाज खानी,संदेश परकर असे सहा उमेदवार रिगणात आहेत कुडाळ मतदार संघात- पाच उमेदवार निवडणूक रिंगणात असून महाविकास आघाडीकडून ठाकरे सेनेचे आमदार वैभव नाईक विरुद्ध महायुतीचे शिंदे सेनेकडून माजी खासदार निलेश राणे लढत होत आहे
तसेच महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून अंनतराज पाटकर,बहुजन समाजवादी पक्षाकडून रवींद्र कसालकर, अपक्ष उमेदवार उज्वला येवाळीकर असे पाच उमेदवार रिंगणात आहेत सावंतवाडी मतदार संघात- सहा उमेदवार निवडणूक रिंगणात असून महायुतीकडून शिंदे सेनेचे आमदार दीपक केसरकर विरुद्ध महाविकास आघाडीकडून ठाकरे सेनेचे राजन तेली त्याशिवाय अपक्ष उमेदवार विशाल परब,अर्चना घारे, सुनील पेडणेकर,दत्ताराम गावकर हे सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.