You are currently viewing हळवल फाटा येथे कारला अपघात, ६ प्रवासी जखमी…

हळवल फाटा येथे कारला अपघात, ६ प्रवासी जखमी…

हळवल फाटा येथे कारला अपघात, ६ प्रवासी जखमी…

कणकवली

महामार्गावर हळवल फाटा येथे कारला पहाटे ५ च्या सुमारास अपघात झाला. यात कारमधील ६ प्रवासी जखमी झाले. कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकाला आदळली. कार गोवा ते मुंबई अशी जात होती. अपघातानंतर कार पलटी झाली. अपघातात कारच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अपघातात बेगम महमंद हनिफ चौकापूर ( वय ४० ), आयान मुकत्यार गन्नेवाले ( वय १४ ), मौला गुलाबसाब शिगाली ( वय २८ ), बाशिरा मम्मदगौस हकूलदार ( वय ७२ ), अमीर मम्मदगौस हवालदार ( वय ३३ ), आलिया महाबुसाल शिगाली ( वय ११ ), पाईजा जापर कुमुमय ( वय ११. सर्व रा. ( मडगाव – गोवा) हे जखमी झाले. अपघातातील जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा