You are currently viewing उद्योग विभागांतर्गत सर्व आस्थापनांना 20 नोव्हेंबरला मतदानासाठी सुट्टी

उद्योग विभागांतर्गत सर्व आस्थापनांना 20 नोव्हेंबरला मतदानासाठी सुट्टी

उद्योग विभागांतर्गत सर्व आस्थापनांना 20 नोव्हेंबरला मतदानासाठी सुट्टी

उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने काढले परिपत्रक

 सिंधुदुर्गनगरी

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024  साठी येत्या 20 नोव्हेंबर 2024  रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्य रीतीने बजावता येण्यासाठी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने सुट्टी जाहीर केली आहे. या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्य रितीने बजावता यावा यासाठी खालील प्रमाणे आदेश देण्यात आले आहेतः-

             निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रातील कोणत्याही व्यवसायात, व्यापारात, औद्योगिक उपक्रमात किंवा इतर कोणत्याही आस्थापनेमध्ये कार्यरत असलेल्या आणि राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला, मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाईल.  सदर सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना इत्यादींना लागू राहील.

            सुट्टीच्या कारणास्तव अशा कोणत्याही व्यक्तीच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही आणि जर अशा व्यक्तीला अशा दिवसासाठी सामान्यत:वेतन मिळणार नाही या आधारावर कामावर ठेवले असेल, तरीही त्या दिवशी त्याला सुट्टी दिली नसली तर त्याने काढले असते तर असे वेतन त्याला अशा दिवसासाठी दिले जाईल. जर एखाद्या नियोक्यासुने नियमांचे उल्लंघन केले तर असा नियोक्ता निवडणूक आयोगाच्या नियमानुसार शिक्षेस पात्र असेल.

            अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन  तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत त्यांनी संबंधित जिल्हा निवडणुक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापना घेणे आवश्यक राहील.

            वर नमूद केल्यानुसार मतदारास मतदानाकरीता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास नियोक्या विरुध्द नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल.  उद्योग, ऊर्जा, व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी, व्यवस्थापनाने या सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल, याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी रा.रा. जाधव यांनी केले आहे.

             अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 02360-228872 वर संपर्क साधावा

प्रतिक्रिया व्यक्त करा