तीन दिवस उपोषण सुरू असूनही आरोग्य विभागाचे दुर्लक्ष
ओरोस
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चिराग माईन्सच्या कर्मचाऱ्यांचे तिसऱ्या दिवशीही आमरण उपोषण सुरू असून या कर्मचाऱ्यांपैकी दोन कर्मचाऱ्यांची तब्येत खालावली आहे. मात्र अद्यापही प्रशासनाच्यावतीने या कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी झालेली नसल्याचे उपोषण कर्त्यां कडून सांगण्यात आले.
चिराग माईन्सच्या कर्मचाऱ्यांना मागील ११ महिने पगार नसल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी 12 जानेवारी 2021 पासून या कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. याबाबत तोडगा काढण्यासाठी संबंधित कंपनीचे कुणीही अधिकारी या ठिकाणी फिरकलेले नाहीत त्यामुळे अद्यापही त्यांच्या पगाराचा प्रश्न प्रलंबित आहे. तेव्हा पगार केव्हा मिळणार या प्रतीक्षेत सर्व कर्मचारी आमरण उपोषण करून पर्यंत लढा देण्याच्या पवित्र्यात आहेत.