पंतप्रधान मोदींमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची ओळख बदलली
स्वॉप्टवेअर निर्यातीत भारत जगात भारी
नरेटीव पसरविण्याचे यावेळी मात्र यशस्वी होणार नाही
*५२ टक्के इंडस्ट्रीज महाराष्ट्रात आल्या;महाराष्ट्र १ ट्रिलीयन डॉलर वर
कणकवली : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली अनेक राज्य सरकारे बरखास्त गेले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे केले का ? आज काहींना वाटतं देश असुरक्षित आहे, परंतु मोदींमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची ओळख बदललेली आहे. पूर्वी आपण वापरत असलेल्या १०० मोबाईल पैकी ९८ पर देशातून येत होते. आता १०० पैकी ९८ भारतात बनतात. सोलर एनर्जी, गतिमान रस्ते स्टार्टअप इंडिया अशा अनेकाविध माध्यमातून देश अग्रेसर होत आहे. कच्च्या तेलाच्या होणाऱ्या आयातीपेक्षाही आपण सॉफ्टवेअर निर्यातीमध्ये पुढे आहोत जी निर्यात अमेरिकेपेक्षाही जास्त आहे. मात्र लोकसभेला काहींनी नकारात्मकता पसरवली. परंतु विधानसभेला ही नकारात्मकता यशस्वी होणार नाही कारण असा नरेटीव लोकशाहीसाठी घातक आहे. मात्र आपला कॉमनमॅन स्मार्ट तो असा नरेटिव कधीही टिकू देणार नाही.असे थेट वक्तव्य ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत डॉ. उदय निरगुडकर यांनी केले.
येथील प्रहार भवन येथे पत्रकारांशी वार्तालाप करताना डॉ. निरगुडकर म्हणाले, आतची निवडणूक ही माझ्यादृष्टीने उमेदवार विरूद्ध उमेदवार, पक्ष विरूद्ध पक्ष किंवा विचारधारा विरूद्ध विचारधारा अशी नाहीच आहे. तर येथे नकारात्मकता पसरविण्याचा प्रयत्न आहे. येथे अशांतता असावी, अराजकता निर्माण व्हावी यासाठीचा प्रयत्न होताना दिसतो. लोकशाहीचा प्रयोग काही देशांमध्ये फसला. आता भारतात तो प्रयत्न करण्याचा काहींचा प्रयत्न आहे. त्यामुळे ही निवडणूक लोकशाहीमधील मोठी लढाई आहे. लोकसभेला काहींनी संविधान बदरणार असल्याचा प्रचार केला पण त्याचा मोठा फरक पडलेला नाही.
आज राज्यातील काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. यात कांदा, सोयाबीन, कापूस दराचा प्रश्न आहे. सरकार त्याबाबत पावले उचलत आहे. मात्र, मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे. कारण ही निवडणूक गोंधळात टाकणारी आहे. खूप काही शिकवून जाणारी निवडणूक असले. काही ठिकाणी धक्कादायक निकालही लागू शकतात. मात्र, भारतीय लोकशाही ही अतिशय सुंदर आहे. येथील कॉमनमॅन स्मार्ट आहे. त्यामुळे लोकसभेला नकारात्मकता पसरवून जो प्रयत्न झाला, तो आता यशस्वी होईल, असे वाटत नाही, असेही डॉ. निरगुडकर म्हणाले.
लोकशाही धोक्यात असल्याचे सांगणारे प्रयोग यापुर्वी अनेक देशांत झाले. छोट्या गोष्टींवरून वातावरण तापविणे, लष्कराने ताबा घेणे आपण पाहिले. मात्र, अशा ठिकाणी ज्यामहिला पुर्वी मुक्त होत्या, त्यात आता बुरखा काढण्यासाठी लढत आहेत. त्यामुळे नकारात्मकतेचा कितीही प्रयत्न झाला तरीही अंडरकरंट असून जनता यावेळी फैसला करेल. जर्मनी बरबाद झाल्यानंतर पुन्हा उभारी घेतली. त्यावैळी तेथील ग्रोथ रेट हा ६.५ ते ७ टक्के होता. आणि त्याच कालावधीत आपाला ३.३ टक्के होता. आज आपला ग्रोथ रेट ७.५ टक्के पर्यंत आहे. मात्र, भारतीयांच्या मेंदूवर काही नकारात्मक गोष्टी लादण्याचा प्रयत्न होत आहे. लाईफस्टाईल, थिंकींग बदलण्याचा प्रयत्न होत आहे. नापल्या भारतीय संस्कृतीला धोका आहे. या साऱ्यावर आता आंतरराष्ट्रीय प्रभाव दिसतो. आता हे युद्ध निवडणूकीत आल्याचे दिसते. मात्र, हे सारे कोण पसरवतोय? आपणाला २८८ ही मतदारसंघात नोटा हवाय का? आपणाला अराजकता आणायची आहे का? आज विचार केला तर नवरा किंवा बायकोही सर्वोत्तम मिळत नाही, मग उमेदवार कसा मिळणार? असा सवाल डॉ. निरगुडकर यांनी केला. बदलापूरची घटना निषेधार्ह आहे. पण बदलापूर बंद असताना तेथे फडकविण्यात आलेल्या बॅनरच्या प्रिंट कुठून आल्या? हेच वॉर ऑफ नरेटिव्ह असल्याचे डॉ. निरगुडकर म्हणाले.
बॉक्स
महाराष्ट्र राज्य आज मोठ्या प्रगतीकडे वाटचाल करत आहे. देश आज पाच ट्रीलीयन डॉलर असेल तर महाराष्ट्र १ ट्रिलीयन डॉलर आहे. गेल्या पाच वर्षांत देशातील ५२ टक्के इंडस्ट्रीज महाराष्ट्रात आल्या. स्टार्टअप, वंदेभारतसारखे यशस्वी उपक्रम आले. आपण १०० टक्के पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीत बदल करत नाही, तोपर्यंत शेती आणि शेतकरी तग धरणार नाही. लाकडीबहिणसारखी योजना चांगली आहे. ही रक्कम स्वयंगोजगारात आली तर गेम चेंजर होईल. पण आज १५०० रुपये कसे देणार? तिजोरीत एवढी रक्कम आहे का? विचारणारेच आपण महिन्याला ३ हजार देणार असल्याचे सांगत असल्याचे डॉ. निरगुडकर म्हणाले.