तळवणेतील कांदळवन तोड प्रकरणी चौकशी सुरू…
सावंतवाडी
वन्यप्राण्यांकडून झालेल्या नुकसानीपोटी जिल्हा नियोजनच्या निधीतून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी साडेसहा लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यात वन्यप्राण्यांकडून जखमी झालेल्या लोकांसह नुकसान भरपाई प्राधान्याने देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, अशी माहिती सावंतवाडी वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक इस्माईल जळगावकर यांनी दिली.
दरम्यान तळवणे येथे झालेल्या कांदळवन तोड प्रकरणी संबंधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशा सूचना तहसिलदारांना दिल्या आहेत. ते त्या समितीचे पदाधिकारी असल्यामुळे पुढील निर्णय घेतील, असे जळगावकर म्हणाले.