कुडाळ :
आमदार वैभव नाईक यांच्यावर कितीही खोटे नाटे आरोप करा लोक समजुन आहेत गुंडगिरीला थारा द्यायचा नाही. आमदार वैभव नाईक सारख्या प्रामाणिक व्यक्तीलाच पुन्हा आमदार बनवायच हा निर्धारच कुडाळ मालवण मतदारसंघातील लोकांनी केला आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे अतुल बंगे यांनी केले आहे
श्री बंगे बोलताना म्हणाले गेल्या दहा वर्षांत आमदार वैभव नाईक मतदार संघात दीसु लागले विकास काय आणि कसा असतो तो आम नाईक यांनी दाखवला या पुर्वी ज्या लोकांनी आमदार, खासदार, मंत्री पदे भोगली त्यांनी लोकांची निराशा केली आणि आता वैभव नाईक यांच्या लोकप्रियतेमुळे धास्तावलेले उमेदवार सध्या आम नाईक यांच्या वर खोटे नाटे आरोप करुन मते पदरात पडतात काय या साठी धडपडत आहेत तसेच राणेसमर्थक भाजप वाले कार्यकर्त्यांचा प्रवेश दाखवुन आम नाईक यांना धक्का अशा बातम्या छापुन आणत आहेत असे सांगून श्री बंगे म्हणाले आमदार नाईक हे आपल्यावरच हल्ला करुन सहानभुती मिळवतील त्या मुळे पोलीस संरक्षणाची मागणी विरोधी उमेदवार करत आहेत मात्र पोलीस संरक्षणाची गरज ही राणे कुटुंबांना लागते वैभव नाईक स्वतः एकटे लढतात अनेक हल्ले या लोकांनी केले ते डगमगले नाहीत मर्दासारखे लढत राहीले म्हणुनच तुमची २०१४ ला दहशत एकट्या वैभव नाईक यांनी कुडाळ मालवण मतदार संघातील जनतेच्या ताकदीवर संपवली आणि त्यांच्या पुढे आपली डाळ शिजत नाही म्हणून वैभव नाईक यांचीच काॅपी करत तुम्ही सुद्धा लोकांसमोर जाऊन मते मागतात असा आरोप श्री बंगे यांनी करुन धुप कापुर गणपतीला वाटतात म्हणून टीका केला मात्र अकरा वर्षे आपल्या मतदारसंघातील प्रत्येक घरात पुजेचे साहीत्य पोच करुन आपली सेवा बजावली त्यातही तुम्ही पण तुमची छबी छापुन रीकाम्या पिशव्या आणि तुमच कॅलेंडर पोचवलात पण हे तुमच कॅलेंडर पण कोणी आपल्या घरात लावत नाही ही पण एक शोकांतीका आहे, तुम्ही इडीच्या भितीने भाजपमध्ये प्रवेश केलात परंतु वैभव नाईक धनुष्य बाण निषाणीवर निवडुन येतात म्हणून तुम्ही आता धनुष्य बाण चोरलात आणि भाजपला राम राम ठोकलात आता वैभव नाईक मशाल निशाणी वर निवडुन आले कि पुढच्या वेळी तुम्ही मशाल निशाणी चोरायला बघणार पण हा तुमचा खेळ मतदार ओळखुन आहेत जनतेचा खरा कैवारी आमदार वैभव नाईकच आहेत म्हणून तुम्ही कीतीही प्रचार खालच्या पातळीवर जाऊन करत असाल तरी कुडाळ मालवण मतदार संघातील जनतेला मात्र आपला लाडका माणुस म्हणून वैभव नाईकच आमदार पाहीजे असे श्री बंगे यांनी सांगितले.