*पक्ष बदलणारे निलेश राणे नको – प्रवेशकर्त्यांनी दिली प्रतिक्रिया*
कुडाळ :
आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ मालवण मतदार संघात राणेंना धक्क्यावर धक्के सुरूच ठेवले आहेत. आ.वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कुडाळ तालुक्यातील गोठोस गावातील कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देत शुक्रवारी रात्री आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत मशाल हाती घेतली आहे.गोठोस गावचा विकास हा आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून झाला असून विविध योजनांमधून त्यांनी लाखो रुपयांचा विकास निधी देऊन या भागातील ग्रामस्थांची विकासकामे मार्गी लावली आहेत,असे सांगत यापुढील काळातही ते गोठोस गावातील विकासकामांना प्राधान्य देतील,असा विश्वास प्रवेशकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी बोलताना प्रवेशकर्ते म्हणाले निलेश राणे यांच्या पडत्या काळात त्यांना भाजप कार्यकर्त्यांनी साथ दिली मात्र विधानसभा निवडणूकीत कुडाळ-मालवण मतदारसंघ हा शिंदे गटाच्या वाट्याला आल्यामुळे त्यांनी भाजप कार्यकर्त्यांचा विचार न करता शिंदे गटात उडी मारली आहे तसेच राणे कुटुंब हे प्रथम शिवसेना नंतर काँग्रेस,स्वाभिमान पक्ष,भाजप आणि आता निलेश राणे हे शिंदे गटात गेले आहेत.त्यांच्या या सततच्या पक्ष बदलामुळे कार्यकर्त्यांची फरपट होत आहे.त्यांच्या या सततच्या पक्ष बदलाला कंटाळून व निवडणुकीचे वारे बघून पक्ष बदलणाऱ्या निलेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास नसल्याने आपण निष्ठावंत आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले माझ्यावर व माझ्या पक्षावर जो विश्वास कार्यकर्त्यांनी दाखवला. त्या बद्दल विशेष ऋण व्यक्त करत गोठोस गावचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वासही आमदार वैभव नाईक यांनी प्रवेशकर्त्यांना दिला आहे.
यावेळी विठ्ठल खरात,बाबुराव कोकरे,संदेश कोकरे,एकनाथ कोकरे,सागर कोकरे, धुळोजी कोकरे,शाहू कोकरे,सुनील कोकरे,संतोष कोकरे,संतोष खरात, संदेश वरक,शुभम वरक,सुनील खरात, संतोष वरक,संतोष खरात, संतोष कोकरे, सिताराम कोकरे, नारायण वरक, जानू खरात,ज्ञानेश्वर येडगे,मामू वरक, दशरथ खरात, गुरुप्रसाद खरात, सुरेश वरक या भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला आहे.
याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुकासंघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, विभाग प्रमुख रामचंद्र धुरी,माजी जिल्हा परिषद सदस्य राजू कविटकर, सुधीर राउळ,सुहास सावंत, श्री.ताम्हाणेकर भाई घाडी,एकनाथ मेस्त्री,महेंद्र पिंगुळकरआदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.