*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखक कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*
*🪷🪷बिरसा—राम🪷🪷*
सज्जन शक्ती तारक आणि
करिसी दुष्टा त्राहिमाम् ।
पुन्हा होवू दे बिरसामुंडा
जमदग्नीचा भार्गवराम।।धृ।।
—हे माते गे रेणुका
हे माते गे पोचम्मा—
वर्षे झाली कळा साहुनी
सहनचि अवघे करीत गेलो
ब्राह्मण—आदिवासी म्हणुनी
अत्याचारे मी नटलो
पुन्हा होवू दे महाराष्ट्राला
अवतारांचे पावन धाम ।।१।।
देवुन गेले ऋषि “व्यवस्था”
त्यास देवुनी “वाद” स्वरुप
अधिकारास्तव , सत्तेसाठी
दिले मानुषा गर्दभ रुप
इतिहासा जे विकृत करिती
दुष्ट मानसा दे निजधाम ।।२।।
भीती सोडुन एक होवू या
नीति धरुनी कार्य करु या
सत्य—सत्व हा तिळगुळ वाटुन
असुर गुणांची होळी करु या
आशिर्वच देतील देवता
एकसंघ व्हा अन् निष्काम ।।३।।
कार्य आपुले सुंदरतेचे
संस्कृती वैभव नटलेले
ईशकृती समजून जोडु या
हर्षानंदा मुकलेले
करा तया आश्वस्त आणखी
भरा मनी त्या बिरसा—राम।।४।।
*बिरसा मुंडा जयंती निमित्त भावपूर्ण नमस्कृती.*🙏🙏🪷🪷
*©सर्वस्पर्शी*
©कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख
नाशिक४२२०११
९८२३२१९५५०