महायुतीचे उमेदवार दिपकभाई केसरकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करा….
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सावंतवाडी यांच्या संयुक्त पत्रकाद्वारे मतदारांना आवाहन
सावंतवाडी
नामदार दिपक भाई केसरकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, भाजपा या महायुतीचे उमेदवार श्री दिपक भाई केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हासाठी अनेक सार्वजनिक व लोकाभिमुख योजना मंजूर करून आणल्या आहेत. यातील ठळक बाबी म्हणजे शिरशिंगे येथील रखडलेला धरण प्रकल्पासाठी ६०८ कोटींची मंजूरी, तिलारी ते वेंगुर्ला नळपाणी पुरवठा 200 कोटी रुपये मंजूरी, फुकेरी धरण 110 कोटी रुपये, वेर्ले ९१ कोटी रुपये उडेली येथे धरण मंजूर इत्यादी धरण प्रकल्पांना निधी देऊन काम सुरु होत आहेत. तसेच सिंधुरत्न समृद्ध योजनेला १२४ कोटी, कृषी विभाग १९३ कोटी. आणलेले आहेत. जर्मन भाषा शिकून तरुणीसाठी जर्मन सरकारकडे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी पहीली तुकडी सिंधुदुर्ग जिल्हातील ११५ व जळगावातील ३५ तरुण प्रशिक्षणार्थी जर्मनला जाणार आहोत. जिल्हाच्या विकासासाठी पर्यटनास पुरक असे बरेच निर्णय झालेले असून यामुळे सिंधुदुर्गातील रोजगार क्षमता निश्चीत वाढलेली दिसेल मंत्रिमंडळाच्या प्रमुख ८ मंत्र्यांच्या महत्वाच्या कमीटीचे ते स्वतः अध्यक्ष आहेत. सन्मानिय मुख्यमंत्र्यांनी याची विशेष नोंद घेऊन त्यांना पूर्ण सहकार्य केलेले आहे.
आंबोली, चौकुळ, गेळे, या गावातील कबुलायतदार, शेतकऱ्यांचा प्रश्न सुद्धा चांगल्या प्रकारे मार्गी लावलेला आहे. असे बरेच लोकाभिमुख निर्णय प्रामाणीक पणे व कोणताही गाजावाजा न करता केबीनेट मंत्री मा. दिपकभाई केसरकर यांनी केलेले आहे. आमचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार साहेबत हे सुद्धा त्यांच्या कार्यात खंबीरपणे त्यांच्या सोबत उभे राहिले आहेत. व श्री सन्माननीय दादानी त्यांना निधी देण्याचे महत्वाचे काम बजावलेले आहे.
सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी प्रामाणीकपणे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये मनापासून सहभागी होऊन काम करत आहोत. व माननिय -श्री दिपकभाई केसरकर यांना निश्चीत बहुमताने निवडून आणणार आहोत.
श्री सुरेशराव गवस – मतदासंघ समन्वयक तथा प्रदेश चिटणीस, उदयराव भोसले – तालुका अध्यक्ष सावंतवाडी, ऑगस्टीन फर्नांडिस- शहर अध्यक्ष, सावंतवाडी, संदीप पेडणेकर -तालुकाध्यक्ष वेंगुर्ला, श्री सत्यवान गवस,तालुका अध्यक्ष-दोडामार्ग, श्री अशोक पवार-व्हि. जे. एस. टी. जि. अध्यक्ष,
प्रभाकर गावकर – कामगार सेल जि. अध्यक्ष, श्री अक्लम खतीब – अल्पसं. जि. अध्यक्ष, विजय कदम – सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष, आशिष कदम – उद्योग व्यापार सेल अध्यक्ष, श्री शफीक खान – अल्पसंख्यांक महासचिव, रिद्धी परब – महीला तालुका अध्यक्ष सावंतवाडी. रंजना निर्मल – शहराध्यक्ष सावंतवाडी, सत्यजित देशमुख धारण कर प्रांतिक सदस्य, गुरुदत्त कामत जिल्हा सदस्य, विलास पावसकर जिल्हा सदस्य या सर्वांच्या संयुक्त पत्रकाद्वारे 20 नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायकाळी ६ वाजेपर्यंत दिपक भाई केसरकर यांना धनुष्यबाण निशाणीसमोरील बटण दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा असे आवाहन संयुक्त पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
______________________________
*संवाद मीडिया*
*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍
*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️
*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/
*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️
*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*
*संपर्क*
*📲9422381263 / 📲7720842463*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/152648/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*