कणकवली :
हिंदू देवदेवतांचा अपमान करणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नैतिक जबाबदारी ओळखून भाष्य केले पाहिजे. त्यांनी हिंदू धर्मियांच्या देवदेवतांवर टीका करून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावलेल्या आहेत. स्वतः एक स्त्री असताना सुषमा अंधारे यांनी हिंदू धर्मातील मातृसत्ताक देवतांचा केलेला अपमान पूर्णतः निषेधार्य आहे. वारकरी संप्रदाय त्यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करत आहे. वैभववाडी शहरात येऊन राजकीय भाष्य करणाऱ्या सुषमा अंधारे यांनी प्रथम हिंदू देवतांचा अपमान केला, त्याबद्दल जाहीर माफी मागावी असे आवाहन श्रीहरी वारकरी सांप्रदाय मंडळ वैभववाडी, कोकण दिंडीचे संस्थापक ह.भ. प. श्री.लक्ष्मण कृष्णा जाधव यांनी केले आहे. त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून सुषमा अंधारे यांचा निषेध नोंदविला आहे.
हिंदू देवदेवतांचा आणि पर्यायाने वारकरी सांप्रदायाचा अपमान करणाऱ्या उबाठा सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. वारकरी हा “राम कृष्ण हरी” या शब्दावर जगतो त्याच वारकऱ्याचे आराध्य दैवत श्री देव विठ्ठल आणि आई रुक्मिणी आहे. नवरात्र उत्सवात जगत माता,आदिशक्ती नऊ दिवस नऊ रुपात स्थानापन्न होते. त्या जगत मातेच्या स्थापनेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या आणि देवतांची टिंगल टवाळकी करून भक्तांच्या भावना पायदळी तुडवणाऱ्या सुषमा अंधारे यांचा कोकण दिंडी वारकरी संप्रदाय च्या वतीने जाहीर निषेध करतो.तसे निवेदनात श्रीहरी वारकरी सांप्रदाय मंडळ वैभववाडी कोकण दिंडीचे संस्थापक लक्ष्मण कृष्णा जाधव यांनी म्हटले आहे.
हिंदू देवदेवतांचा अनादर करणाऱ्या सुषमा अंधारे यांना समाजात बसण्या उठण्याचा ही अधिकार नैतिक अधिकार राहिलेला नाही. अशा व्यक्तीने किती बोलावे याचा विचार केला पाहिजे. आपण एक स्त्री म्हणून समाज आपल्याला मानसन्मान देतो मात्र आमच्या मातृसत्ताक देवतांचा आपण ज्या पद्धतीने अपमान केला ते शोभणारे नाही. अशा अशोभनीय वक्तव्याची सुषमा अंधारे यांनी प्रथमता माफी मागितली पाहिजे.असे ह.भ. प. श्री.लक्ष्मण कृष्णा जाधव यांनी म्हटले आहे.या प्रसिद्धी पत्रकात वारकरी संप्रदायाचे सदस्य रमेश आग्रे,दीपक रानम, चंद्रकांत पार्टी,दशरथ पार्टी,वसंत नानचेकर, सुरेश काटाळे,शिवाजी जाधव,सत्यवान जाधव प्रकाश जाधव, प्रकाश नानचेकर, सूर्यकांत आग्रे, सुहासिनी जाधव,संगीता जाधव,प्रतिभा नानचेकर आदींनी निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.