*दिवाळी सुट्टीनंतर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळा परिसर गजबजला*
*बांदा*
दिवाळी सुट्टीच्या आनंदानंतर आज सन २०२४-२५च्या द्वितीय सत्राची सुरुवात सर्वच जिल्हा परिषद शाळांमधून मोठ्या उत्साहाने झाली. या दिवशी पीए श्री बांदा नं.१ केंद्र शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले .गेले २०दिवस बंद असलेल्या शाळा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजल्या.
दुसऱ्या शैक्षणिक सत्रात शैक्षणिक सहल ,वनभोजन,कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव , विज्ञान प्रदर्शन, स्काऊट गाईड जिल्हा मेळावा, वार्षिक स्नेहसंमेलन, बक्षीस वितरण , हळदीकुंकू, शालेय परसबाग, अभ्यासदौराअसे विविध सहशालेय उपक्रम राबविले जातात त्याचबरोबर शिष्यवृत्ती, नवोदय व विविध स्पर्धात्मक परीक्षा या सत्रात विद्यार्थ्यांना द्याव्या लागणार आहेत अशा विविध नानाविध उपक्रमांची रेलचेल असणारे द्वितीय सत्र विद्यार्थ्यांना आनंददायी ठरो यासाठी बांदा केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी मुख्याध्यापक शांताराम असनकर पदवीधर शिक्षक उदय सावळ, उपशिक्षिका रसिका मालवणकर, स्नेहा घाडी,जे.डी.पाटील, रंगनाथ परब, फ्रान्सिस फर्नांडिस, शुभेच्छा सावंत, जागृती धुरी, कृपा कांबळे , सुप्रिया धामापूरकर आदि उपस्थित होते.