*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आंस*
*********************
आज आंस लागली मोक्षमुक्तीची
जगायचे ते सारे जगुनिया जाहले
भोगले सारेच तरी रित्या ओंजळी
सत्य एक भाळीचे अगम्य सोहळे
उरि जरी , सुखदुःखांच्या संवेदना
प्रारब्धभोग अजूनही नाही संपले
जन्मच हा गतजन्मांचेच देणे घेणे
ऋणानुबंध सारे हिशेबात गुंतलेले
ऋणमुक्तीविना ना मुक्ती जीवाला
म्हणुनी मुक्तीचेच ध्यास लागलेले
क्षणभंगुरताच हे वास्तव जीवनाचे
आता निराकारात आत्म हे रंगलेले
***************************
*रचना क्र. १८८*
*#©️वि.ग.सातपुते. (भावकवी)*
*📞 ( 9766544908 ) बेंगलोर*