You are currently viewing ज्ञानेश्वरांची ओंजळ

ज्ञानेश्वरांची ओंजळ

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”ज्ञानेश्वरांची ओंजळ”*

 

ज्ञानोबांनी मागितले देवां पसायदान

विश्‍वशांतीसाठी केले जीवन समर्पण।।धृ।।

 

ओंजळभर जळ पिता भागते तहान

ओंजळभर सुगंध व्यापती सुमनं

ओंजळ मिटता होई आपोआप नमन।।1।।

 

दुःखी होता मन मुख झाकीतो ओंजळीनं

अश्रूंना मिळे वाट हलके होई मन

ईश्वराने दिले समाधानाच परिमाण।।2।।

 

पाठवू नये कोणासही रिकाम्या हातान

दोन्ही करांनी करावे शक्य तेवढे दान

ओंजळ शिकवे नम्रता त्याग अर्पण।।3।।

 

हात जोडता येत आदरभाव स्पंदन

ओंजळ फिरवता मुखां मिळे चैतन्य

करात वसते लक्ष्मी सरस्वती गोविंद।।4।।

 

श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा