आम्हाला वातावरण बिघडवायचे नाही; निवडणुक शांततेत व्हावी हेच आमचे प्रयत्न – निलेश राणे
कुडाळ :
निवडणुक हातातून जाताना दिसत असल्याने शेवटचा पर्याय म्हणून उबाठा उमेदवार स्वतःवर हल्ला झाला असे दाखण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांच्या बाजूच्याच लोकांनी हे सांगितले आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांची सुरक्षा वाढवावी. वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न असेल तर तो स्पष्ट होईल. म्हणजे खरे खोटे जे काही असेल तर जनतेला समजेल. यां गंभीर विषयात पोलिसांनी पावले उचलवीत असे आवाहन महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी पोलीस प्रशासनास केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून निलेश राणे म्हणाले, पोलीस अधीक्षक यांना मी पत्र लिहणार. वैभव नाईकांची सुरक्षा वाढवा. जे काही सुरक्षेच्या दृष्टीने करायाचे ते करा. त्यांचे फोन टॅप करा लोकेशन टॅप करा. प्रसंगी आमचेही फोन टॅप करा जनतेसमोर सत्य यावे ही आमची भुमिका आहे.
कारण आम्हाला वातावरण बिघडवायचे नाही. निवडणुक शांततेत व्हावी हेच आमचे प्रयत्न आहेत. महायुतीचे कार्यकर्तेही शांततेत निवडणुक काम करत आहेत. मात्र वातावरण कोण बिघडवत असेल तर ते कळले पाहिजे. स्वतःवर हल्ला करण्याचा प्रयत्न असेल तर तो स्पष्ट झाला पाहिजे. त्यामुळे यां गंभीर विषयात पोलिसांनी लक्ष द्यावे. पावले उचलावीत असे आवाहन निलेश राणे यांनी केले आहे.