कोल्हापूर वरून आलेल्या दोन ट्रक मध्ये कारिवडे उभा गुंडा येथे अपघात
उपजिल्हा रुग्णालयात तातडीच्या उपचारांअंती पुढील उपचारांसाठी कोल्हापुरात
जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांच्या कडून योग्य ते सहकार्य
सावंतवाडी
दर्शन रवींद्र फोंडेकर राहणार कोल्हापूर जिल्हा शिवाजी विठ्ठल बेडगे कोल्हापूर हे कोल्हापूरहून चार चाकी ट्रकने येत असताना कारिवडे उभा गुंडा या भागामध्ये येत असताना कोल्हापूरच्या दिशेने जाताना सहा चाकी ट्रक यांचा समोरासमोरील ने धडक दिल्याने मोठा अपघात झाला. सहा चाकी ट्रक मध्ये ड्रायव्हर इब्राहिम बालीगर कर्नाटक चा असून अपघात झाल्याने ट्रक मधील ड्रायव्हर गाडीच्या बाहेर फेकले गेले यामुळे तेथील ग्रामस्थांनी मदत कार्य करून रुग्णवाहिकेने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आले त्यामध्ये डॉक्टर प्रशांत जडे तसेच डॉक्टर अपेक्षा कुबल यांनी तातडीने प्राथमिक उपचार करून व सिटीस्कॅन करून योग्य तो औषधोपचार त्यांच्याकडून करण्यात आला त्यामध्ये एका ड्रायव्हरला नाकाला दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांच्या गावी कोल्हापूर जिल्ह्यातील सीपीआर हॉस्पिटलमध्ये त्यांच्या मागणीनुसार पाठवण्यात आले बाकी सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना आपल्या गावी पाठवण्यात आले यामध्ये डॉक्टर प्रवीण देसाई यांनी सुद्धा योग्य ती तपासणी करून व योग्य तो उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले यासाठी रुग्णांना योग्य ते सहकार्य जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी केले आहे अशी माहिती राजू मसुरकर यांनी दिली आहे