You are currently viewing देवगड येथे १४ डिसेंबरला राष्ट्रीय लोकअदालत

देवगड येथे १४ डिसेंबरला राष्ट्रीय लोकअदालत

*देवगड येथे १४ डिसेंबरला राष्ट्रीय लोकअदालत*

देवगड

देवगड दिवाणी न्यायालय ‘क’ स्तर-देवगड येथे १४ डिसेंबर रोजी सकाळी १० वा. राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे. तालुका विधी सेवा समिती-देवगड व तालुका बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही राष्ट्रीय लोकअदालत होणार आहे. ज्या पक्षकारांचे दिवाणी न्यायालयात प्रलंबित असलेले दिवाणी व फौजदारीकडील खटले किंवा सर्व राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, ग्रामपंचायत, वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटवायची आहेत, त्यांनी आपली प्रकरणे तालुका विधी सेवा समिती-देवगड या कार्यालयाकडे तात्काळ दाखल करावीत. ज्या पक्षकारांना आपले प्रकरण चर्चेद्वारे मिटवायचे असेल, अशा पक्षकारांनी वादपूर्व चर्चेसाठी या न्यायालयात हजर राहवे, असे आवाहन दिवाणी न्यायाधीश (क. स्तर), देवगड तथा अध्यक्ष, तालुका विधी सेवा समितीने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा