दारू वाहतूक प्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी केलेल्या कारवाईत कोलगावातील एक ताब्यात…
विक्री करणाऱ्यासह खरेदी करणाऱ्यावर गुन्हा दाखल…
सावंतवाडी
बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे दारू विकणारा आणि खरेदी करणारा असे मिळून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई काल रात्री साडेदहाच्या सुमारास कोलगाव मारुती मंदिर जवळ करण्यात आली. विराज लक्ष्मीकांत वाडकर (वय २१, रा. कोलगाव),अंतोन लॉरेन्स राॅड्रीक्स (रा.किनळे-खालचीवाडी) व वीरेंद्र वासुदेव जाधव (रा. पडेल, ता. देवगड) अशी या तिघांची नावे आहेत.
यातील जाधव हा दारू खरेदी करणारा तर राॅड्रीक्स हा विक्री करणारा आहे. दरम्यान या प्रकरणी वाडकर याच्याकडून ७ लाख किमतीच्या क्रेटा सह एकूण ८ लाख ८३ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. याबाबतची फिर्याद प्रवीण पालकर यांनी दिली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. दिडपसे करीत आहेत.