*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आई…*
सणासुदीच्या दिवशी
ती दारोदार फिरायची
गोडधोड काहीतरी
खायला मागायची
सारेच तिच्याकडे
नैराश्याने बघायचे
पुढे जा म्हणून सांगायचे
ती केविलवाणी व्हायची
चार घरे पुढे जायची
उन्हातान्हात घरोघरी फिरूनही
कोणीच तिला काहीच देत नव्हते
उरलंसुरलंही पदरात तिच्या
कोणी काही टाकतं नव्हते
अशात कोणीतरी फेकलेला
फराळ तिला दिसला
पटापट तिने पिशवीत भरला
धावपळत ती घरी गेली
लेकरांना पाहून गहिवरली
आईने आणलेला फराळ
लेकरांनी पोटभरून खल्ला
तृप्तीचा डेकर दिला
ती माय लेकरांच समाधान
डोळेभरून पहात होती
आनंदाश्रूत भिजत होती
खरचं आई ती आईच असते ना
आई स्वतःउपाशी राहील
पण आधी लेकरांना खायला देईल
म्हणून आईची माया वेडीच असते
आई सारखी दुसरी बाई कुठेच नसते
*(संजय धनगव्हाळ)*
*(अर्थात कुसुमाई)*
९४२२८९२६१८
९५७९११३५४७