You are currently viewing विनाअनुदानित महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेच्या माध्यमातून मंत्री केसरकर यांना पाठिंबा

विनाअनुदानित महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेच्या माध्यमातून मंत्री केसरकर यांना पाठिंबा

मंत्री केसरकर यांचा कोल्हापुरी पद्धतीने घोंगडे, काठी आणि फेटा बांधून सत्कार

सावंतवाडी :

आज सावंतवाडी येथील केसरकर यांच्या निवासस्थानी राज्य संघटनेच्या वतीने मंत्री केसरकर यांचा कोल्हापुरी पद्धतीने घोंगडे, काठी आणि फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष श्री जगदाळे आदी उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने राज्यभरातील शिक्षक या सत्कार सोहळ्याला उपस्थित होते.

आतापर्यंत गेली २० वर्ष महाराष्ट्र राज्यातील विनाअनुदानित व अंशता: अनुदानित शाळांना टप्पा अनुदान मंजूर केले नव्हते. मात्र शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आता २० टक्के, ४० टक्के, ६० टक्केवरून ८० टक्के अनुदान टप्प्याटप्प्याने मंजूर केले आहे. तसा अध्यादेशही काढण्यात आला आहे. त्यामुळे विनाअनुदानित महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेच्या माध्यमातून मंत्री केसरकर यांना पाठिंबा दर्शवण्यात आला आहे.

यावेळी श्री केसरकर म्हणाले आतापर्यंत कोणी शिक्षण विभागाकडे म्हणावं तसं लक्ष दिलं नव्हतं. मात्र आपण ११ हजार कोटी रुपये टप्पा अनुदानासाठी मंजूर केले. तसेच आता पुन्हा एकदा पुढील टप्पा अनुदान देण्याची घोषणा केली आहे. शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण तसेच त्यांना सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने महायुती सरकारने प्रयत्न केलेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या सर्वांच्या माध्यमातून हे शक्य झाले. सर्व शिक्षक व संघटनेने महायुतीला दिलेला पाठिंबा निश्चितच पुन्हा एकदा हे सरकार सत्तेत येणार हे दर्शवणारा आहे असा विश्वास मंत्री केसरकरांनी व्यक्त केला. यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा