पुणे /प्राधिकरण –
प्राधिकरण येथे ग दि माडगूळकर नाट्यगृह सुरू झाल्यानंतर काव्य, नाट्य, नृत्य, एकांकिका सतत सुरू झाल्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरिकांची सांस्कृतिक भूक भागली. तरुणाईला व्यासपीठ उपलब्ध झाले.
ग. दि. माडगूळकर सभागृह निगडी येथे नुकत्याच झालेल्या माहौल ह्या कार्यक्रमात संगीत, शायरी, संवाद यांची उत्स्फूर्त मैफिल दिनांक १३ नोव्हेंबर ला संपन्न झाली.
अभिनेता तेजस बर्वे तसेच अभिनेते डॉ. संजीवकुमार हे देखील यावेळी उपस्थित होते.
” माहौल” संगीत शायरी आणि संवाद यांची एक उत्स्फूर्त मैफिल ही संकल्पना चिंचवड चे तरूण कलाकार सौरभ चव्हाण यांची असून गायक पलाश बोरकर, सौरभ चव्हाण यांना गिटार आणि वोकल्स ची साथ गणेश शीलवंत तर तबला आणि क्लॅपबॉक्स प्रसाद गुरव यांनी दिली. संकल्पनेतील संवाद केतकी चव्हाण यांनी खुलविले.
“सय्योनी”, “छोड आयें हम वों गलियाँ”, “लागा चुनरी मे दांग”, “मेरे रश्के कमर”, “मेरे मेहेबूब कयामत होगी”, “जो तुम मेरे हो” आदि गीतांना रसिकांची पसंती मिळाली.
पिंपरी, चिंचवड, प्राधिकरण, निगडी मधील संगीत रसिकांची उपस्थिती लक्षणीय होती.
बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर
9890567468