You are currently viewing कुठल्याही अपप्रचारला, अफवांना बळी पडू नका – निलेश राणे

कुठल्याही अपप्रचारला, अफवांना बळी पडू नका – निलेश राणे

मालवण :

आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार श्री. निलेश राणे यांच्या प्रचारार्थ मालवण कुंभारमाठ येथील अथर्व हॉल येथे शिवसेना पक्षाचा जाहीर मेळावा पार पडला. यावेळी महायुतीचे उमेदवार श्री. निलेश राणे खासदार, मा. श्री. नारायणराव राणे, मंत्री मा. ना. श्री.उदय सामंत, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, महेश कांदळगावकर, अशोक सावंत, बबन शिंदे, राजा गावकर, बाळा चिंदरकर,रुपेश पावसकर, किसन मांजरेकर, महेश राणे, नीलम शिंदे, रत्नाकर जोशी, बाळू नाटेकर, प्रियांका मेस्त्री, मधुरा तुळसकर, पराग खोत, अरुण तोडणकर आदी उपस्थित होते.

नारायण राणे म्हणाले विधानसभा निवडणुकीत महायुतीचे तिन्ही उमेदवार विजयी होण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी. जिल्ह्याच्या विकासासाठी मी शब्द देत आहे.

तर उदय सामंत म्हणाले की, शिवसेना वाढवण्यासाठी नारायण राणे यांनी दिलेले योगदान कोणीही विसरू शकत नाही, यामुळे राणेंवर टीका करताना सर्वांनी आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे असा टोला त्यांनी ठाकरे सेनेच्या नेत्यांना लगावला. महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. येत्या २३ नोव्हेंबरला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच्या सर्व महायुतीचे उमेदवार विजयी होऊन निष्ठाधारी कोण ? आणि बाळासाहेबांची शिवसेना कोणी वाचवली व वाढवली हे महाराष्ट्राला दिसून येईल, असेही सामंत यांनी सांगितले.

यावेळी निलेश राणे म्हणाले की, येणाऱ्या पाच सहा दिवसामध्ये कसलाही अपप्रचार होईल, काही सांगण्यात येईल. त्यामुळे यावेळी कुठल्याही अफवांना जनता बळी पडणार नाही आणि २३ तारखेला सिंधुदुर्ग, रत्नागिरीतून महायुतीचे उमेदवार विजयी होतील सर्वत्र विजयाची रॅली निघेल, असे निलेश राणेंनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा