खास.नारायण राणे यांची आज तोफ धडाडणार
*महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ वेंगुर्ला व दोडामार्ग मध्ये सभा*
*दोडामार्ग
सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे शिवसेना,भाजप, राष्ट्रवादी, आरपीआय महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ आज गुरुवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी दुपारी २.३० वाजता खासदार नारायण राणे यांची जाहीर सभा वेंगुर्ला येथील स्वामिनी मंगल कार्यालय येथे तर संध्याकाळी ५ वाजता दोडामार्ग पिंपळेश्वर हॉल येथे होणार आहे. वेंगुर्ला येथील सभेस स्टार प्रचारक म्हणून उद्योगमंत्री उदय सामंत तर दोडामार्ग येथील. सभेस गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित राहणार आहेत.
महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, गणेशप्रसाद गवस,भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, सुधीर दळवी,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर, सत्यवान गवस, आरपीआय तालुकाध्यक्ष विलास राठये व रामदास कांबळे यांनी केले आहे.