You are currently viewing जिल्हास्तर युवा महोत्सव 21 नोव्हेंबरला

जिल्हास्तर युवा महोत्सव 21 नोव्हेंबरला

जिल्हास्तर युवा महोत्सव 21 नोव्हेंबरला

सिंधुदुर्गनगरी 

सन 2024-25 या वर्षातील युवा महात्सवाचे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य  व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नेहरू युवा केंद्र, सिंधुदुर्ग  (युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय, भारत सरकार) यांच्या संयुक्त विद्यमाने  जिल्हास्तर युवा महोत्सवाचे  आयोजन दि. 21 नोव्हेंबर 2024 रोजी जिल्हा नियोजन समिती  सभागृह (नवीन) येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती नेहरु युवा केंद्राचे  जिल्हा युवा समन्वयक यांनी दिली आहे.

युवा महोत्सवाचे आयोजन जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर करुन राज्याचा प्रातिनिधिक चमु राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी पाठविण्यात येतो. राष्ट्रीय युवा महोत्सव सन २०२४-२५  मध्ये संकल्पना आधारित बाबींसाठी “विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नव संकल्पना” –  “Innovation in Science and Technology” ही संकल्पना दिलेली आहे. . या संकल्पनेवर आधारित जिल्हा युवा महोत्सवात विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.  दि.२१ नोव्हेंबर २०२४ रोजी  स. वाजता जिल्हा नियोजन समिती हॉल (नवीन) सिंधुदुर्गनगरी ता.कुडाळ जि. सिंधुदुर्ग येथे जिल्‍हास्‍तर युवा या स्पर्धेमध्ये सहभागासाठी १५ ते २९ वयोगट राहील ( १२ जानेवारी २०२५ रोजी ) वयाबाबत परीगणना करावी. स्पर्धक जिल्ह्याचा रहिवासी असावा. प्रत्येक स्पर्धेसाठी  MY  Bharat साईट वर  नोदणी  करणे गरजेचे आहे.

    विज्ञान प्रदर्शन मेळा :- या  मध्ये  2 प्रकारच्या   स्पर्धा आहेत.

प्रकल्प ,संकल्पना ,प्रात्यक्षिक ,माहिती ,तसेच पर्यावरणास हानी होणार नाही अशा प्रकल्पांचा अंतर्भाव असावा . विज्ञान व तंत्रज्ञान विषयक ज्या प्राणाली अस्तित्वात आहेत त्या सोडून नवीन संकल्पना यांचा अंतर्भाव करण्यात याव्यात .हे प्रकल्प जैवतंत्रज्ञान, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, अक्षय ऊर्जा, पर्यावरण संवर्धन, आरोग्य सेवा तंत्रज्ञान, डिजिटल सोल्यूशन्स इत्यादींसह विविध क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतील. उदा . सूर्यमाला व धरणे इ.अस्तित्वात प्रणाली  या बाबींसारख्या सातत्याने प्रदर्शित होणाऱ्या संकल्पना शक्यतो अंतर्भाव करण्यात येऊ नये.

(अ) ग्रुप ईवेंट :- एक टीम मध्ये जास्तीजास्त  5 सदस्य असू शकतात. विजेत्या  स्पर्धकाला प्रथम  रु. 7000, द्वितीय  रु. 5000, तृतीय रु. 3000 अशी  बक्षीस देण्यात येईल.  (ब) वैयक्तिक ईवेंट :- . विजेत्या स्पर्धकाला प्रथम  रु. 3000, द्वितीय  रु. 2000, तृतीय  रु. 1500 बक्षीस देण्यात येईल.

 

  1. समुह लोकनृत्य आणिसोलो लोकनृत्य वैयक्तिक   समुह लोकनृत्य सादरीकरणासाठी वेळ मर्यादा 15 मिनिटे राहील. सामूहिक लोकनृत्यातील सहभागींची संख्या जास्तीत जास्त 10 असेल. वैयक्तिक  लोकनृत्य सादरीकरण वेळ मर्यादा 7 मिनिटे राहील. प्रथम क्रमांकाचा संघ पुढील स्तरावर पाठविण्यात यावा. समूह लोकनृत्य विजेत्या स्पर्धकाला प्रथम  रु. 7000, द्वितीय रु. 5000, तृतीय रु. 3000 बक्षीस देण्यात येईल.

 

  1. लोकगीत आणि वैयक्तिक सोलो  लोकगीत  लोकगीतासाठी वेळ मर्यादा  7 मिनिटे राहील. लोकगीत ( समुह ) मध्ये सहभाग संख्या 10 राहील. प्रथम क्रमांकाचा संघ पुढील स्तरावर पाठविण्यात यावा.  समूह  लोकगीत   विजेत्या स्पर्धकाला प्रथम  रु. 5000, द्वितीय रु. 3000, तृतीय रु. 2500 बक्षीस देण्यात येईल. सोलो लोकगीत विजेत्या स्पर्धकाला प्रथम रु. 3000, व्दितीय रु. 2000, तुतीय रु. 1500 बक्षीस देण्यात येईल.
  2. कथा लेखन- कथा लेखन खालील विषयाच्या संकल्पनेवर सादर करण्यात यावी. कथा लेखन साठी जिल्हा विभाग राज्य स्तरावरील सहभागी होणाऱ्या युवांच्या संकल्पनेतील कथा असावी. कथा लेखनासाठी सुमारे 1000 शब्द मर्यादा राहील. यासाठी वेळमर्यादा 1 तास राहील. कथा लेखनासाठी भाषा इंग्रजी, हिंदी व मराठी राहील. कथा लेखनातील प्रथम तीन क्रमांक जिल्हास्तरावरुन विभागस्तरावर व विभागातून राज्यस्तरावर पाठविण्यात येईल. विजेत्या स्पर्धकाला प्रथम  रु. 3000, द्वितीय  रु. 2000, तृतीय रु. 1500 बक्षीस देण्यात येईल.
  3. कविता –प्रत्येक सहभागी युवा स्पर्धकाला एकच कविता लिहीण्याची मुभा राहिल. कविता लेखनासाठी 500 शब्दमर्यादा राहील. कविता लेखनासाठी 60 मिनिटे मर्यादा राहील. विषय कार्यक्रमाच्या  ठिकाणी दिला जाईल. जिल्हा स्तरावरुन 2 कविता विभागस्तरावर व विभागातून राज्यस्तरावर पाठविण्यात याव्यात. विजेत्या स्पर्धकाला प्रथम  रु. 2500, द्वितीय  रु. 1500, तृतीय रु. 1000 बक्षीस देण्यात येईल.
  4. चित्रकला स्पर्धा –स्पर्धकांची चित्र आयोजकांसमक्ष काढणे बंधनकारक राहील. पोस्टर स्पर्धेसाठी वॉटर कलर, ॲक्रेलिक, ऑईल पेंट, पेस्टल्स, चारकोल इ. मध्ये पेंटीग करण्याची मुभा राहील. कलर आपल्याला आणावे लागतील चित्रकला स्पर्धेसाठी वेळ मर्यादा दिड तास राहील.  प्रथम दोन क्रमांकाचे पोस्टर जिल्हा स्तरावरुन विभागस्तरावर व विभागातून राज्यस्तरावर पाठविण्यात यावेत. विषय कार्यक्रमाच्या  ठिकाणी दिला जाईल. विजेत्या स्पर्धकाला प्रथम रु. 2500, द्वितीय  रु. 1500, तृतीय रु. 1000 बक्षीस देण्यात येईल.
  5.  वक्तृत्व स्पर्धा (इंग्रजी व हिंदी)-  वक्तृत्व स्पर्धेसाठी 7 मिनिट वेळ राहील.     इंग्रजी व हिंदी भाषेत वक्तृत्व सादरीकरण आवश्यक राहील. स्पर्धेचा विषय  विकसित भारत का लक्ष्य (Goal of Developed India)  विजेत्या स्पर्धकाला प्रथम रु. 5000, द्वितीय रु. 2500, तृतीय रु. 1500 बक्षीस देण्यात येईल.

 

  1. मोबाइल फोटोग्राफी स्पर्धा  :-    विषय कार्यक्रमाच्या  ठिकाणी दिला जाईल.    कृपया आपले  smartphone कार्यक्रमाच्या ठिकाणी  घेऊन येणे.  तीथे घेतलेली  3 फोटो  स्पर्धक  द्वारा softcopy मध्ये  परिक्षक कडे जमा करावी लागेल. विजेत्या स्पर्धकाला प्रथम रु. 2500, द्वितीय रु. 1500, तृतीय रु. 1000 बक्षीस देण्यात येईल.
  2.   युवा कृती,     1) हस्तकला:- विजेत्या स्पर्धकाला प्रथम  Rs 3000, द्वितीय  Rs 2000, तृतीय Rs 1500 बक्षीस देण्यात येईल. 2) वस्त्रोउद्योग :-  विजेत्या स्पर्धकाला प्रथम रु. 3000, द्वितीय रु. 2000, तृतीय रु. 1500 बक्षीस देण्यात येईल. 3) ॲग्रो प्रोडक्ट  :- विजेत्या स्पर्धकाला प्रथम रु. 3000, द्वितीय रु. 2000, तृतीय रु. 1500 बक्षीस देण्यात येईल.

या सर्व स्पर्धा एकाचवेळी आयोजित केल्या जातील.   सहभागी फक्त एका कार्यक्रमात सहभागी होऊ शकतो. सर्व स्पर्धकांना प्रवास खर्च दिला जाईल. या सर्व स्पर्धा एकाचवेळी आयोजित केल्या जातील. अधिक माहितीसाठी  जिल्हा क्रीडा विभाग सिंधुदुर्ग यांच्याशी  9867699281 / 7208450181 व नेहरू युवा केंद्र, सिंधुदुर्ग 9176093429 /9421267011  या क्रमांकावर संपर्क करावा.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा