*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित बालक दिनानिमित्त बालकविता*
*आवडता प्राणी…..ससा*
आवडता प्रिय माझा
छान गुबगुबीत असा
शुभ्र मऊ मुलायम
आहे आमचा ससा।।१
आला घरी तेव्हाच
पिल्लू इवलं, इवलंसं
भित्रं तर इतकं की
करायचं कसं आपलंसं।।२
शुभ्र रंग,लांब कान
डोळे माणिक जणू
याला खेळवायला
काय बरं खेळणीआणू?३
.सुंदरसा मस्त पिंजरा
त्याच्या केला रक्षणास
पालेभाज्या ,गाजराचे
चट् फस्त करतो घास।।४
इतर सर्व प्राण्यापासून
दूर त्याला ठेवायचे
आवाजाने मोत्याच्या
घाबरत कोपर्यात दडायचे।।५
कधी सोडायचं मोकळं
पिंजर्याबाहेर काढून
उड्या मारायचं टणाटण
स्वारी खुष होऊन।।६
सुंदरसा ससा माझा
सगळ्यांचा जीव की प्राण
आनंद देतो मनाला
विरंगुळा आहे छान!!७
🐇🐇🐇🐇🐇🐇🐇🐇
अरूणा दुद्दलवार@✒️