मालवण / पेंडूर:
गेल्या काही दिवसांपूर्वी अनवधानाने उबाठा मध्ये प्रवेश केलेल्या पेंडूर परबवाडी येथील ग्रामस्थ व महिला वर्ग यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी मध्ये जिल्हा बँक संचालक बाबा परब यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. महायुतीचे कुडाळ मालवण मतदार संघाचे उमेदवार निलेश राणे यांना भरघोस मतदान करून विजयी करणार असा निर्धार देखील यावेळी करण्यात आला. त्यावेळी कोणतीही पूर्व कल्पना न देता आमदार वैभव नाईक यांनी आमचा प्रवेश घेतला होता. त्यामुळे आम्हाला ते मान्य नसल्याने आम्ही अधिकृत रित्या पुन्हा एकदा खासदार नारायणराव राणे, जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि महायुतीचे कुडाळ मालवण मतदार संघाचे उमेदवार निलेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आमच्या भागातील उर्वरित विकास कामे पूर्ण करून घेण्यासाठी पुन्हा एकदा या परिवारात सामील होत आहोत असे देखील यावेळी प्रवेशकर्ते यांनी सांगितले. गेली अनेक वर्षे खासदार नारायणराव राणे यांच्या माध्यमातूनच गावात विविध विकास कामे झालेली आहेत. पुढे देखील खासदार राणे व पुढील आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही यावेळी बाबा परब यांनी दिली.
यावेळी विश्राम परब, लक्ष्मण परब, विलास परब, यशवंत परब, भारती गावडे, भावना प्रभू, विणा परब, लक्ष्मी परब, मोहनिष प्रभू, सुधाकर परब, वनिता परब, नितीन परब, चंद्रकांत परब, चंद्रकला परब, आत्माराम परब, सुवर्णा परब, सुरेखा परब, प्रगती परब, श्रीकृष्ण परब, मेगावती धुरी, अलका परब, अपेक्षा परब, ललिता कदम, हरिश्चंद्र परब, निनाद परब, आशीष परब, भरत गावडे, सुभाष परब व इतर ग्रामस्थ व प्रवेशकर्ते उपस्थित होते.
यावेळी जिल्हा बँक संचालक बाबा परब, सरपंच नेहा परब, उपसरपंच सुमित सावंत, शक्ती केंद्र प्रमुख आतिक शेख, दीपा सावंत, पंचायत समिती प्रभारी शेखर फोंडेकर, सतीश पाटील, बूथ अध्यक्ष बिपिन परब, संदेश नाईक, विष्णू लाड, विक्रांत नाईक, बाळा भोगले, नंदू परब, स्वप्नील सावंत, मिलिंद चव्हाण, रवींद्र चव्हाण तसेच इतर ग्रामस्थ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.