*जीवन सुखी पाहिजे, तर क्रांती करायला हवी*
*खळा बैठकांमध्ये मंत्री दीपक केसरकर यांचा संवाद*
*दोडामार्ग तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद*
दोडामार्ग:
जर्मनीत चार लाख युवकांना रोजगाराच्या संधी आहेत. त्यांना भारतापेक्षा अधिक पगार मिळणार आहे. त्यांची व्हिजासह सर्व व्यवस्था सरकार करणार आहे. जीवन सुखी पाहिजे तर क्रांती करायला हवी. महायुतीला बदनाम करण्याचे काम विरोधक करीत आहेत. या निडणुकीमध्ये मला भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री व महायुतीचे उमेदवार दिपक केसरकर यांनी मतदारांना केले.
त्यांच्या प्रचारार्थ दोडामार्ग तालुक्यातील झरेबांबर, सरंगे, कोनाळकट्टा, हेवाळे, घोडगेवाडी, मोर्ले, भेडशी- साटेली येथे खळा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मतदारांनी त्यांच्याशी संवाद साधला. बैठकीला शिवसेनेचे दोडामार्ग तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवस, युवा तालुका प्रमुख भगवान गवस, भाजपचे गोवा प्रभारी दत्ता नाईक रेडकर, भाजप तालुका उपाध्यक्ष सुधीर दळवी, उपाध्यक्ष अनंत तळणकर, शिवसेना युवा तालुका प्रमुख भगवान गवस, महिला तालुका प्रमुख चेतना गावडे, सानवी गवस, राष्ट्रवादी तालुका प्रमुख सत्यवान गवस, आरपीआयचे रामदास कांबळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्याला फसवणाऱ्या उमेदवाराला मतदारसंघात थारा देऊ नका. शिवरामराजेंची परंपरा पुढे चालवूया. निवडून आल्यानंतर महिन्यातून एकदा सर्व गावांमध्ये येणार असल्याचे आश्र्वासन त्यांनी दिले.
तिलारी येथे युवक, महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच वन्यप्राण्यांपासून होणार त्रास कमी करण्यासाठी येथे अभयारण्य तयार करण्यात येणार आहे. शिक्षण विभागात मी अनेक कामे केली. प्रत्येक शाळेत ज्युनिअर सिनियर केजी सुरू केली आहे. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रम शिकवण्यात येणार आहेत. मी केलेल्या कामांचे नारळ विरोधक फोडीत असल्याचे त्यांनी सांगितले.