You are currently viewing माझ्यावर टीका करतात तेव्हा माझे मताधिक्य वाढते: दिपक केसरकर

माझ्यावर टीका करतात तेव्हा माझे मताधिक्य वाढते: दिपक केसरकर

माझ्यावर टीका करतात तेव्हा माझे मताधिक्य वाढते: दिपक केसरकर

कटू बोलले तरी नारायण राणेंच्या मनात काही नाही…

सावंतवाडी:

कोकणी जनतेच प्रेम, संस्कृती उध्दव ठाकरेंना कळणार नाही. त्यांच्या विरोधात मी बोलणार नाही. माझ्यावर टीका करतात तेव्हा माझे मताधिक्य वाढते. त्यांनी चांगला निर्णय घेतला असता तर पक्ष दुभागला नसता. जनतेच्या भल्याच्या योजना मी आणल्या आहेत त्यामुळे कोकणी जनता माझ्या व महायुतीच्या पाठीशी राहणार असल्याचा विश्वास शालेय शिक्षण मंत्री व महायुतीचे उमेदवार दिपक केसरकर यांनी व्यक्त केला.
उबाठा गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी सावंवाडीत केलेल्या टीकेला श्री. केसरकर यांनी उत्तर दिले. यावेळी महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. नारायण राणे कटू बोलले तरी त्यांच्या मनात काही नसते. त्यांच्या वाक्याचा विपर्यास करून टीका करण्याची विरोधकांना सवय आहे. त्यांची विकासकामे पहा. जिल्ह्यामध्ये शांतता बाळगण्याचे काम आम्ही करणार आहोत असे त्यांनी सांगितले.

विशाल परब यांच्या व्हायरल ऑडियो क्लिपवर बोलताना श्री. केसरकर म्हणाले, विशाल परब यांना देवेंद्र फडणवीस फोन करू शकत नाही. पैशाच्या जीवावर निवडणूक लढविणाऱ्यांना कोकणची जनता जागा दाखवून देईल असे त्यांना सांगितले.

श्री. केसरकर पुढे म्हणाले, सिंधुदूर्ग जिल्ह्याचा विकास वेगाने होत आहे. पाणबुडी प्रकल्प, योजनांना निधी मी मंजूर केला. गेळे येथील जमनीचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी सोडवला. उद्धव ठाकरेंच्या गाड्या तपासल्या त्यात गैर काही नाही. ते प्रशासनाचे काम आहे. त्यामुळेच निवडणुका निरपेक्ष होतील. लवकरच मालवण येथे ९ एकरवर शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा