क्षमतेपेक्षा जास्त चिरा वाहतूक करणाऱ्या ट्रकची चाके तुटल्याने फोंडाघाट मध्ये वाहतुकीचा खोळंबा
फोंडाघाट
पुन्हा आज फोंडाघाट एस.टी. स्टॅंड समोर चिरा वाहातुक करणा-या ट्रकची चाके तुटुन ट्रक बंद पडल्याने वाहातुकीचा बोजवारा उडाला आहे. एस.टी. स्टॅंड मधुन बायपास रस्ता सुरु आहे. पोलीस वंजारे व्यवस्थित काम करत आहेत. अवजार ट्रॅक वर कारवाई आर.टी.ओ. का करत नाही.या बद्दल अजित नाडकर्णी आरटीओ ऑफिसला तक्रार करणार आहेत. आणि हे काम जर आरटीओ ऑफिसला शक्य नसेल तर आंदोलन उभारण्याचे इशारा त्यांनी दिला आहे. गाडीच्या पासींग पेक्षा ज्यादा वजनाच्या घाटावरील गाडीवर कारवाई करा करा .आर.टी.ओ.ची माणसं घाटात काय करतात हा प्रश्न अनुत्तरणीय आहे. जर पोलीस यंत्रणा सक्षम नसेल तर आजही काल सारखे १६ तास वाहातुक खोळंबली असती.
ट्राफीक सिंधुदुर्ग ईनचार्ज श्री.खोपडे साहेबांना फोन केला.त्यांनी हा विषय मिटवतो म्हणुन सांगीतले.हेवी लोड वरही कारवाई करतो असे अजित नाडकर्णी यांना सांगितले.
*अजित नाडकर्णी,शुभांजीत श्रृष्टी*