You are currently viewing कार्तिक पौर्णिमा

कार्तिक पौर्णिमा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कार्तिक पौर्णिमा* 

 

कार्तिकी सोहळा

हरिहरा ध्यावे

भक्तीने पुजावे

विष्णू शिव||

 

दिस एकादशी

भजन पूजन

असावे निमग्न

स्मरणात||

 

येता चतुर्दशी

अद्वैत रुपाचे

विष्णू नि शिवाचे

मनी ध्यान ||

 

तुळशी आवळा

पतीत पावन

घडावे पूजन

कृष्णासवे||

 

तुळशी शिवास

बेल तो विष्णुला

एकत्वे भरला

विश्वामधे||

 

त्रिपुरी पौर्णिमा

दीप उजळावे

तेजास भरावे

ह्रदयात||

 

रम्य सांजवेळी

नदी तीरावर

दीप शुभंकर

अरु वंदे||

 

🌹🌹🪔🪔🪔🪔🪔🌹🌹

*अरुणा दुद्दलवार @✍️*

प्रतिक्रिया व्यक्त करा