*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम लेख*
*’मतदान करावं का?’*
****************
फक्त सत्तेसाठीच
पक्षाने पक्ष फोडला
आता मतदान करावं की नाही
प्रश्न मला पडला
खरचं की मतदान का करावं तशी योग्य आणि लायक उमेदवार आहेत का? सत्तेसाठी सत्ताधाऱ्यांनी काय नाही ते केले हे आपल्याला माहीतच आहे.मग प्रश्न पडतोच की का मतदान करावं. खरतर लोकशाही राहिलीच नाही असं मला वाटतं कारण ज्या मतदारांच्या मतांमुळे सत्तास्थापण होते त्यांना या पुढाऱ्यांनी विदूषक करून टाकला. त्यांना माहित झाले आहे की काहीतरी आमिष दाखवायचं आणि सत्तेवर यायचं या भूलभूलैयावर माणूस भूलतो आणि कसलाच विचार न करता मत देऊन मोकळा होतो. आणि खरं सांगायचं झालं तर सध्याच राजकारण राजकारण राहिल नाही.मतभेदा बरोबर मनभेदही त्यांच्यात दिसून येते.सत्तेसाठी काहीही करायला हे पुढारी मागेपुढे पहात नाही अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन ते टीका करतात. म्हणून नको ते आरोप प्रत्यारोप करून आतले बाहेरचे खाजगी वाभाडे काढून जनतेला हसू करताय. यांच्या आपसातल्या व्यक्तगत भांडणामुळे गोरगरीब जनता जिथल्या तिथे आहे.
अरै आपल्या मतावर सत्ता घेणारे सत्तेवर येऊन इतका माजोरपण करतात तेव्हा सहाजिकच प्रश्न पडतो की मतदान करावं की नाहीं करावं,करावं तर का?मान्य आहे ना की मतदान करणे हा आपला हक्क आहे.ते एक राष्ट्रीय कर्तव्य आहे. मग निवडून येणारा नेता काय कर्तव्य करतो कोणते कर्तव्ये पार पाडतो! सत्तेवर आलेले नेते खरचं कर्तव्यदक्ष असतात का?,त्यांनी दिलेले कोणते आश्वासन ते पुर्ण करता.मतदारांच कोणतं हित त्यांच्या जवळ आहे. जनतेने निवडलेल्या उमेदवाराला त्यांच्या कार्यक्षेत्रातील आवश्यक ती कामं केली की नाही याचा जाब विचारण्याची हिंमत जर एखाद्याने दाखवली तर त्या पुढाऱ्यांच्या अवतीभोवती रेंगाळणाऱ्या गुंडामार्फत त्यांना उत्तर दिलं जातं हि वास्तविकता आहे.तेंव्हा हे पुढारी एकमेकांवर आरोप करून भांडण करून निव्वळ जनतेची दिशाभूल करतात.कारण या पुढाऱ्यांच्या भांडणामूळे कुठेच विकास दिसतं नाही किंबहुना विकास होत नाही.महागाई, बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे.शेतीला भाव नाही.नको त्या योजना सुरू करून जनतेला आळशी करून टाकलाय त्यापेक्षा या नेत्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला तर अनेकांना काम मिळेल.बेकारी नाहीशी होईल.व्यापार व्यवसायासाठी कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध करून दिले तर अनेकाचं भलं होईल.पण तसं होत नाही.शिवाय शिक्षीत नवं तरूणांना जर राजकारण संधी दिली तर राजकारणात एक सकारात्मक बदल दिसू शकतो. सध्याच राजकारणात पारदर्शकता राहीलीच नाही.आपल्या वडिलांच्या काळात जे राजकारण व्हायचं ते जनतेच्या हिताचा राजकारणात व्हायचं त्या़ंच्या जवळ जनतेच्या हिताचा आणि देशाच्या विकासाचा अजेंडा होता आणि फक्त मतभेदातून राजकीय खेळीने विकासावर भर देत असे.पण सध्या देशाचं राष्ट्रांच आणि जनतेच तर जाऊच द्या स्वत:च्या सात पिढ्यांच कसं भलं करता येईल याचाच जास्त विचार करतात. सत्तेसाठी पळवापळवी फोडाफोडी अदलाबदल करून स्वतःच शुध्दीकरण करून मी तो नाही या आविर्भावात पुन्हा सत्तेवर तेच दिसतात.तेव्हा खरंच संविधानाच्या तत्त्वावर राजकारण चालतंं का? हा संशोधनाचा भाग आहे. आहो काहीतरी परिवर्तन झाल्याशिवाय जुन्यांना डावलून नव्या तरूणांना संधी दिली तर पुढील येणारा काळ कदाचित सुवर्ण काळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही असं मला वाटतं.कारण सध्या तरूण पिढीकडे देशाच्या विकासाच फार मोठ व्हिजन आहे.आणि त्यांना संधी दिली तर निश्चितच त्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही.केवळ निवडणूक येण हि घराण्याशाहीची मक्तेदारी नाही.राजकारण करणे फक्त घराणेशाहीचाच हक्क नाही.जे मतदान करतात त्यांचा ही हक्क आहे.आणि आता नवीन मुलांनी राजकारणात प्रवेश करून ही घराणेशाही बंद केली पाहिजे.कारण सध्या राजकारणात जे चाललंय ते अतिशय भयानक आहे.लोकशाहीच्या विरोधात संविधानाला न शोभणारे असं राजकारण आणि राजकीय पुढारी आहेत हे मात्र निश्चित.
*संजय धनगव्हाळ*
*(अर्थात कुसुमाई)*
९४२२८९२६१८
९५७९११३५४७