You are currently viewing तिन्ही विधानसभा मतदार संघात सखी, युवा व दिव्यांग मतदान केंद्र असणार…

तिन्ही विधानसभा मतदार संघात सखी, युवा व दिव्यांग मतदान केंद्र असणार…

तिन्ही विधानसभा मतदार संघात सखी, युवा व दिव्यांग मतदान केंद्र असणार…

सिंधुदुर्ग

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात एकूण ३ महिला, ३ युवा आणि ३ दिव्यांग असे एकूण ९ विशेष मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील यांनी दिली.

यात महिला (सखी) मतदान केंद्र:- कणकवली- केंद्र क्र. ३०२, जि.प. प्रा. शाळा नं. १ कलमठ बाजार, कुडाळ – केंद्र क्र. २६० बिबवणे, जि.प. पु.प्रा.शाळा बिबवणे क्र. १ व सावंतवाडी- केंद्र क्र. २६, आडेली, वेंगुर्ला येथे तर दिव्यांग मतदान केंद्र:- कणकवली- केंद्र क्र. ३३२, जि.प. पूर्ण प्राथ. शाळा नं १,ओसरगाव, कुडाळ – केंद्र क्र. १२२- बागवाडी, जि.प. प्राथमिक शाळा काळसे, बागवाडी, सावंतवाडी- केंद्र क्र. ४९- वेंगुर्ला तर युवा मतदान केंद्र:- कणकवली- केंद्र क्र. ६८, जामसंडे, देवगड, कुडाळ – केंद्र क्र. १०३, मालवण, न.प. रघुनाथ देसाई महविद्यालय मालवण सभागृह, सावंतवाडी- केंद्र क्र. २८३- दोडामार्ग अशी केंद्रे असणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा