२४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त “जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा-२०२४” चे आयोजन*
ग्राहक पंचायत महाराष्ट्र, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे आयोजन
वैभववाडी
२४ डिसेंबर या “राष्ट्रीय ग्राहक दिना” निमित्त ग्राहक पंचायत-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने “जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा-२०२४” चे आयोजन करण्यात आले आहे.
संपूर्ण अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेला ग्राहक राजा सजग व्हावा, ग्राहकाला आपले हक्क, अधिकार आणि कर्तव्ये याची जाणीव व्हावी, ग्राहक चळवळ सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचावी, ग्राहक संरक्षण कायद्याच्या प्रसाराबरोबरच शोषणमुक्त समाज निर्मितीसाठी २४ डिसेंबर या “राष्ट्रीय ग्राहक दिना”निमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा-२०२४ चे आयोजन करण्यात आले असून सदर निबंध स्पर्धा बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा वैभववाडी आणि पोलीस ठाणे वैभववाडी यांनी पुरस्कृत केली आहे.
सदर निबंध स्पर्धा कनिष्ठ महाविद्यालयीन गट, महाविद्यालय गट व खुला गट अशा तीन गटात आयोजित केली असून निबंध स्पर्धेचा सविस्तर तपशिल पुढील प्रमाणे-
१) पहिला गट- कनिष्ठ महाविद्यालयीन गट (इयत्ता ११ वी व १२ वी)
विषय- ग्राहक म्हणून माझी अपेक्षा.
शब्दमर्यादा २०० ते २५०
२) दुसरा गट- महाविद्यालय गट
विषय- मॉल संस्कृती आणि ग्राहक
शब्दमर्यादा- ३०० ते ३५०.
३) तिसरा गट- खुला गट
विषय- चळवळीचे सामर्थ्य आणि ग्राहक
शब्दमर्यादा- ४०० ते ४५०.
स्पर्धकांनी आपला निबंध स्वच्छ अक्षरात फुल स्केप पानाच्या एका बाजूला लिहिलेला असावा. स्पर्धकाने आपले संपूर्ण नाव, पत्ता, वर्ग, कनिष्ठ किंवा महाविद्यालयाचा पूर्ण पत्ता व संपर्क क्रमांक स्वतंत्र पानावर लिहावा. निबंध दिनांक १५ डिसेंबर पर्यंत संस्थेच्या खालील पत्त्यावर पाठवावेत. प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांकांना बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा
वैभववाडीच्या वतीने अनुक्रमे रोख रु.५०१/-, ३०१/- व २०१/- व पोलीस ठाणे वैभववाडीच्या वतीने सन्मान चिन्ह आणि संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र देऊन राष्ट्रीय ग्राहक दिनी गौरविण्यात येईल. तरी जिल्ह्यातील अधिकाधिक स्पर्धकांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात येत आहे.
स्पर्धकांनी आपले निबंध अध्यक्ष /सचिव, ग्राहक पंचायत महाराष्ट्र, सिंधुदुर्ग जिल्हा शाखा घर नं. ५४४ ‘श्रीनीश’ मु. पो. ता.वैभववाडी, जि.सिंधुदुर्ग 416 810 या पत्त्यावर पाठवावेत. अधिक माहितीसाठी अध्यक्ष प्रा.एस.एन.पाटील (9834984411), संघटक श्री. सिताराम उर्फ दादा कुडतरकर (9422239090) व सचिव श्री.संदेश तुळसणकर (9420100946) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.