*महायुती महिला आघाडी कडून दोडामार्ग मध्ये दिपक केसरकर यांचा जोरदार प्रचार*
*दोडामार्ग शहरात रॅली तर मणेरी विभागात घरोघरी जातं प्रचार*
*दोडामार्ग
विधानसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांना 1 नंबरच बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी विजयी करा असा दोडामार्ग शहरात महायुतीच्या महिलांनी रणरणत्या उन्हात जीवाची पर्वा नकरता प्रचारार्थ रॅली काढत प्रत्येक व्यापारी, दुकानदार, रिक्षाचालक, पायलट यांच्या भेटी गाठी घेतल्या.
विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस राहिलेत त्याच पाश्वभूमीवर आज दोडामार्ग आठवडा बाजारा दिवशी महायुतीच्या महिला पदादिकारी कार्यकर्त्यांकडून महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांचा प्रचार केला. शहरातील दुकानदार, व्यापारी, फेरीवाले, आठवडा बाजारा दिवशी आलेले व्यापारी, ग्राहक, रिक्षा, पायलट यांना दीपक केसरकर यांच्या धनुष्य बाण चिन्हाचे पॅम्प्लेट देऊन दीपक केसरकर यांना मतदान करा असे आवाहन केले. यावेळी शिवसेना महिला तालुकाप्रमुख चेतना गडेकर, तालुका प्रमुख सानवी गवस, शहर प्रमुख शितल हरमलकर, उपजिल्हाप्रमुख मनीषा गवस, भाजप महिला तालुकाप्रमुख दीक्षा महालकर, नगरपंचायत नगरसेविका संध्या प्रसादी, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष हसीना शेख, जिल्हाचिटणीस कल्पना बुडकुले, नेहा ठाकूर, शिवसेना महिला उपशहर प्रमुख राधिका गडेकर, सविता नाईक, प्राची चव्हाण झरे सरपंच श्रुती देसाई, अंजली बुगडे आदी महायुतीच्या महिला पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होत्या. दोडामार्ग शशारातून भरघोस मते दीपक केसरकर यांनाच मिळणार असल्याचे यावेळी महिला वर्गाकडून सांगण्यता आले. व सर्व दुकानदार , व्यापारी फेरीवाले रिक्षा चालक यांचा दीपक केसरकर यांना पाठिंबा असल्याचे प्रचारा वेळी सांगण्यात आले.
*मणेरी विभागातही महिला आघाडीकडून जोरदार प्रचार*
विधानसभा निवडणुकीच्या सावंतवाडी मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आपले दिपक केसरकर यांचा दोडामार्ग तालुक्यातील मणेरी विभागात मोरगाव, आडाळी, कळणे, उगाडे, मणेरी गावातील प्रत्येक वाडीवर जातं महायुतीच्या महिला आघाडीने प्रचार करीत दिपक केसरकर यांच्या “धनुष्य बाण” चिन्हा समोरील बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी शिवसेना महिला तालुका प्रमुख सौ. चेतना गडेकर, सौ. सान्वी गवस, भाजप च्या महिल तालुका प्रमुख सौ. दिक्षा महालकर, शिवसेना उपतालुका प्रमुख सौ. पूजा देसाई, विभाग प्रमुख सौ. गुणवंती गावडे व मोरगाव शाखा प्रमुख सौ. हेमलता नाईक उपस्थित होत्या.