मालवण :
मसुरे येथील ग्रामदैवत श्री देव भरतेश्वरा चरणी निलेश राणे यांच्या विजयासाठी मसुरे देवस्थान प्रमुख मधुकर उर्फ बाबू प्रभूगावकर यांच्या हस्ते श्रीफळ ठेवून विधिवत गाऱ्हाणे घालून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. निलेश राणे यांचा या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने विजयी होण्यासाठी उपस्थित सर्वांनी साकडे घातले. मसुरे देवस्थान प्रमुख मधुकर प्रभुगावकर यांनी यावेळी प्रचाराचा शुभारंभ केला.
यावेळी मसूरे जिल्हा परिषद प्रमुख निरीक्षक महेश मांजरेकर, मधुकर प्रभूगावकर, माजी जि प अध्यक्ष सरोज परब, माजी उपसभापती छोटू ठाकूर, भारतीय जनता पक्षाचे कणकवली येथील युवा नेते समीर प्रभुगावकर, मसुरे माजी सरपंच लक्षमी पेडणेकर,अजय प्रभूगावकर, माजी पंचायत समिती सदस्य महेश बागवे, माजी ग्राम पंचायत सदस्य विलास मेस्त्री, माजी ग्रामपंचायत सदस्य जगदीश चव्हाण, सचिन पाटकर, पुरुषोत्तम शिंगरे, तात्या हिंदळेकर, पंढरीनाथ मसुरकर, यासीन सय्यद,शिवाजी परब, किरण पाटील,राजू सावंत, बंडू गावडे,श्री मेस्त्री,संतोष पेंडूरकर,सतीश मसुरकर आणि शिवसेना पक्ष, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी पक्ष, आरपीआय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
मसुरे विभागातून निलेश राणे यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांमधून करण्यात आला.