आनंददायी कृतियुक्त विज्ञानअध्यापनातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास.
सरमळे शितपवाडी शाळेतील शिक्षक दत्ताराम सावंत यांचा अभिनव उपक्रम .
सरमळे शितपवाडी शाळेत विविध.उपक्रमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास घडविणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. शाळेतील विज्ञांनप्रेमी शिक्षक दत्ताराम सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे. आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये शिक्षणासोबतच व्यक्तिमत्व विकास हा फार गरजेचा असून त्याची सुरुवात विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेतच देणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यांचे शिक्षण उपलब्ध होत नाही. मात्र एखादा शिक्षक उपक्रमशील असेल तर विद्यार्थी कितीही दुर्गम भागातील असले तरीही अतिशय योग्य मार्गदर्शनाद्वारे आपला व्यक्तिमत्व विकास साधू शकतात. शिक्षक दत्तराम सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शीतपवाडी शाळेतील विद्यार्थी आत्मविश्वासाने बोलत आहेत. दुर्गम. भागातील शाळा असून सुद्धा मुलांची गुणवत्ता वाखाण्याजोगी आहे. विद्यार्थी आत्मविश्वासाने विज्ञान प्रयोग करत आहेत, प्रयोग करण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून सांगत आहेत. या नवोपक्रमातून व्यक्तिमत्त्व विकासाचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. या उपक्रमाला सहाय्यक शिक्षक सुदाम वाघेरा यांच्यासह केंद्रप्रमुख मा . प्रमोद पावसकर सर यांचे सुद्धा मार्गदर्शन लाभले आहे. शिक्षकांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये झालेला बदल बघून पालक वर्ग सुद्धा समाधानी असून त्यांनी या शिक्षकांचे कौतुक केले आहे.