उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदवहीची प्रथम तपासणी पुर्ण
सिंधुदुर्गनगरी
निवडणूक खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदवहीची प्रथम तपासणी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हयातील तीनही विधानसभा मतदार संघाची एकत्रीत बैठक संपन्न झाली, असल्याची माहिती जिल्हा खर्च सनियंत्रण समितीचे समन्वय अधिकारी अमित मेश्राम यांनी दिली आहे.
या बैठकीस जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अनिल पाटील, निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. दिव्या के.जे., समन्वय अधिकारी जिल्हा खर्च सनियंत्रण समिती अमित के. मेश्राम व डॉ. शिवप्रसाद खोत, तीनही विधानसभा मतदार संघातील सहाय्यक खर्च निरीक्षक, लेखापथक, व्हिडीओ पाहणी पथक प्रमुख तसेच निवडणूक लढवणारे उमेदवार, प्रतिनिधी या बैठकीस उपस्थितीत होते.
या बैठकीमध्ये निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. दिव्या के.जे यांनी उमेदवारांचे नामनिर्देशन दिनांकापासून ते दि.7 नोव्हेंबर 2024 पर्यंतचे सर्व उमेदवारांचे खर्चाच्या नोंदवहीची प्रथम तपासणी करुन यामधील उणिवांबाबत अभिप्राय दिला. खर्च निरीक्षक यांनी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना, त्यांच्या प्रतिनिधींना निवडणूक कालावधी दरम्यान निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांकडून करण्यात येणारे सर्व प्रकारचे खर्च नोंदविण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. तसेच निवडणूक खर्चाचे सनियंत्रण करणारी समिती ही उमेदवारांकडून करण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या खर्चावर बारकाईने नजर ठेवून असलेबाबत सर्व उमेदवारांना, प्रतिनिधींना अवगत केलेले आले आहे. दिनांक 7 नोव्हेंबर 2024 पर्यंतचा खर्च मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तसेच उमेदवाराने सादर केलेले लेखे कोणत्याही व्यक्तीस रु. 1/- प्रती पान या दराप्रमाणे उपलब्ध होवू शकतील.