आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ नगरपंचायतीकडुन विकासाचा सपाटा – अतुल बंगे
कुडाळ
कुडाळ नगरपंचायत ही आमदार वैभव नाईक आणि मा खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली काम करत असल्यानेच कुडाळ शहरांमध्ये विकासकामांचा सपाटा सुरू आहे आणि गेल्या दहा वर्षांत आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ शहरातील महत्त्वाच्या विकासकामांची पुर्तता केल्यानेच आमदार नाईक यांना पाठबळ आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे अतुल बंगे यांनी केले
कुडाळ कुंभार वाडी,नाबरवाडी उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेविका सौ श्रेया गवंडे यांच्या प्रभाग मध्ये आम नाईक यांच्या प्रचारार्थ श्री बंगे बोलत होते ते बोलताना म्हणाले आम नाईक यांनी दहा वर्षे काम केले नाही ही ओरड विरोधक मारत आहेत परंतु गेल्या पंचवीस वर्षांत या भागात विकास कुठे दीसलाच नव्हता फक्त कोटि कोटींची उड्डाणे वृत्त पत्रांतुन वाचण्यात समाधान मानत होतो या उलट आमदार नाईक यांनी कुडाळ बसस्थानक, कुडाळ मधील क्रिडांगण, मच्छिंद्रनाथ कांबळी नाट्यगृह,भंगसाळ बंधारा, ऐतिहासिक घोडेबाव सुशोभीकरण , कुडाळ मधील महीला रुग्णालय अशी कामे केली आणि कुडाळ नगरपंचायत महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक यांना करोडो रुपयांचा निधी दील्या मुळे प्रत्येक नगरसेवकांच्या प्रभागातील विकास कामे होऊ शकली त्यामुळे नगसेवकांना विकास कामे करण्यासाठी ताकद मिळवुन देण्याचे काम आम नाईक यांनी केले असे सांगुन श्री बंगे म्हणाले कुडाळ शहरातील अजुनही विकास करायचा आहे त्यासाठी दीवसरात्र मेहनत घेऊन आम नाईक यांच्या विजयासाठी प्रयत्न करुन पालकमंत्री पुढच्या महीन्यात आम नाईक यांचे कुडाळ मध्ये स्वागत भव्य दिव्य करुया असे आवाहन श्री बंगे यांनी केले
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, युवा सेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेविका सौ श्रेया गवंडे यांनीही मार्गदर्शन केले यावेळी नगरसेवक उदय मांजरेकर युवा सेना जिल्हा समन्वयक सुशिल चिंदरकर, कुडाळ शिवसेना शहरप्रमुख संतोष शिरसाट, युवा सेनेचे राजु गवंडे, नगरसेविका सौ श्रृती वर्दम,माजी नगरसेवक जिवन बांदेकर, युवा सेनेचे अमित राणे, कुडाळ शिवसेना उपशहरप्रमुख गुरु गडकर, पक्ष निरीक्षक पंढरी तावडे, युवा सेना शहरं प्रमुख संदीप महाडेश्वर, मितेश वालावलकर,बबन कुंभार,आदी उपस्थित होते